loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री समर्थ कृपा विद्यालयाचे दहावी परीक्षेत यश

खेड - श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडियम स्कूल व ज्यूनिअर कॉलेज (सी .बी .एस.ई.) वेरळ मधील इ. दहावी (२०२५ - २०२६) विद्यार्थ्यांनी भरघोस यश प्राप्त केले आहे. यामध्ये सिया शेट्टी (९६.४०%), रुद्र घोसाळकर (९४.२० %), अर्शिया पालेकर (८४.४०%) यांनी उत्तम गुण मिळवून प्रशालेमध्ये अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावण्याचा मान मिळवला आहे. सिया शेट्टी हिने आयटी व आर्य केळकर याने मराठी विषयामध्ये १०० पैकी १०० गुण मिळवले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच आदिती बांद्रे (८१.४०%) ईश्वरी घाडगे (८१.२०%), आर्य केळकर (८०.४०%) या विद्यार्थ्यांनी उत्तम यश संपादन करुन प्रशालेच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष सुयश पाष्टे, उपाध्यक्षा सुप्रिया पाष्टे, शाळा व्यवस्थापन समितीचे चेअरमन उदय शेटवे, खजिनदार दिग्विजय इंदुलकर, प्राचार्य डॉ.एस.एस.अली, विनोद कुमार सिंग, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg