loader
Breaking News
Breaking News
Foto

भंडारी फाऊंडेशनच्या एकांकीका स्पर्धेत पैठणीने मिळविला प्रथम क्रमांक

रत्नागिरी (वार्ताहर) : भंडारी फाऊंडेशन, रत्नागिरी पुरस्कृत ‘जिल्हास्तरीय एकांकीका स्पर्धा २०२६’ यावर्षी प्रथमच आयोजित करण्यात आली. या स्पर्धेमध्ये ‘पैठणी’ ही एकांकीका प्रथम क्रमांक प्राप्त ठरली. मराठी प्रयोगिक रंगभूमीवरील नव्या कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि रत्नागिरीतील कलेचा वारसा जपण्यासाठी ‘भंडारी फाऊंडेशन, रत्नागिरी’ या संस्थेने जिल्ह्यात एकांकीका स्पर्धा आयोजित केली. त्याला उत्तम प्रतिसाद लाभला. एकूण ८ संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला. सदर स्पर्धा स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी येथे शुक्रवार दि. १० एप्रिल २०२६ रोजी घेण्यात आली. दत्ता बोरकर, ज्येष्ठ रंगकर्मी यांचे हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. ज्येष्ठ रंगकर्मी सर्वश्री श्रीकांत पाटील व दशरथ रांगणकर, संस्थेचे पदाधिकारी सर्वश्री रुपेन्द्र शिवलकर, अमोल आरेकर, उल्हास लाड, पराग भाटकर, सुहास धामणसकर, गजानन मयेकर, विनायक भाटकर, राजेश पाटील, धनंजय चवंडे, तुळशीदास पाटील, विनया भाटकर. परीक्षक अजित पाटील, अनुया बाम, अमोल रेडीज हे यावेळी उपस्थित होते. एकूण ८ संघांनी एकांकीका सादर केल्या. बक्षीस वितरणासाठी मुख्य अतिथी म्हणून ज्येष्ठ अभिनेते (चित्रपट) अभय खडपकर, ज्येष्ठ कथालेखक राजेंद्रकुमार घाग, कॅ. दिलीप भाटकर, ऍड. पुष्पराज शेट्ये, सभापती अर्थ विभाग, जिल्हा परिषद नंदकुमार उर्फ नंदा मुरकर, सभापती स्वच्छता विभाग नगर परिषद राकेश उर्फ बाबा नागवेकर, सभापती बांधकाम संतोष ऊर्फ बंटी कीर हे उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे : ‘पैठणी’ या एकांकीकेला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक अभय खडपकर आणि राजेंद्रकुमार घाग व पुरस्कर्ते संदेश ऊर्फ बाबुशेठ चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. ‘प्रेम की यातना’ या एकांकीकेला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक नंदकुमार ऊर्फ नंदा मुरकर व पुरस्कर्ते अमोल आरेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. ‘कुबडा तू बडा’ या एकांकीकेला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक कॅ. दिलीप भाटकर व पुरस्कर्ते पराग भाटकर, राजेश पाटील यांचे हस्ते प्रदान करण्यात आले. ‘लज्जा द्यावी सोडून’ या एकांकीकेला उत्तेजनार्थ पारितोषिक राकेश ऊर्फ बाबा नागवेकर व पुरस्कर्ते विनायक भाटकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. ‘पॅडल’ या एकांकीकेला उत्तेजनार्थ पारितोषिक अ‍ॅड. पुष्कराज शेट्ये व पुरस्कर्ते सौ. विनया भाटकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. गजानन शेट्ये यांना उत्कृष्ट अभिनेता व शुभम गोविलकर यांना उत्तेजनार्थ अभिनेता हे पारितोषिक संतोष ऊर्फ बंटी कीर व पुरस्कर्ते गजानन मयेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

राधा टिकेकर यांना उत्कृष्ट अभिनेत्री व ऋतुजा काटकर यांना उत्तेजनार्थ उत्कृष्ट अभिनेत्री हे पारितोषिक विनया भाटकर व पुरस्कर्ते उल्हास लाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. ऐश्वर्या बापट यांना लक्षवेधी भूमिका हे पारितोषिक सुहास धामणसकर व पुरस्कर्ते हेळेकर परिवार, रत्नागिरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. दिपक माणगांवकर यांना उत्कृष्ट दिग्दर्शकाचे पारितोषिक पुरस्कर्ते दशरथ रांगणकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. विनायक अपकारे यांना उत्कृष्ट नेपथ्य हे पारितोषिक रुपेन्द्र शिवलकर व पुरस्कर्ते हेळेकर, रत्नागिरी परिवार यांचे हस्ते प्रदान करण्यात आले. समिधा देवळेकर यांना उत्कृष्ट पार्श्वसंगीत हे पारितोषिक पुरस्कर्ते धनंजय चवंडे व तुळशीदास पाटील यांचे हस्ते प्रदान करण्यात आले. साई शिर्सेकर यांना उत्कृष्ट प्रकाश योजना हे पारितोषिक पुरस्कर्ते श्रीकांत पाटील यांचे हस्ते प्रदान करण्यात आले. बक्षीस वितरण सोहळ्याचे सूत्रसंचालन सर्वश्री विनायक भाटकर व दशरथ रांगणकर यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg