loader
Breaking News
Breaking News
Foto

‘राष्ट्रीय तृतीयपंथी दिवसा’निमित्त ठाण्यात 'विभागीय कार्यशाळा व चर्चासत्र' संपन्न

ठाणे (प्रतिनिधी) : तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे पुढाकार घेण्यात आला आहे. प्रादेशिक उपायुक्त (समाज कल्याण, मुंबई विभाग) आणि सहाय्यक आयुक्त (समाज कल्याण, ठाणे) यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, 15 एप्रिल रोजी येथील डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या मिनी थिएटरमध्ये ‘राष्ट्रीय तृतीयपंथी दिवसा’ निमित्त विशेष विभागीय कार्यशाळा व चर्चासत्र संपन्न झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त विभागीय आयुक्त सिद्धाराम सालीमठ, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, तृतीयपंथी हक्क संरक्षण व कल्याण मंडळाच्या सह उपाध्यक्ष डॉ.सान्वी जेठवाणी, सदस्य डॉ. सलमा उमरखान साखरकर, विभागीय तृतीयपंथी हक्कांचे संरक्षण व कल्याण मंडळ मुंबई सह अध्यक्ष सोनाली चौकेकर, सदस्य निलोफर मास्के, नूतन राठोड, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त तथा विभागीय तृतीयपंथी हक्कांचे संरक्षण व कल्याण मंडळ मुंबई चे सदस्य सचिव बाळासाहेब सोळंकी, सहाय्यक आयुक्त समाधान इंगळे रविकिरण पाटील, पांडुरंग वाबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक विभागात आणि जिल्ह्यात तृतीयपंथीयांच्या तक्रार निवारणासाठी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या कार्यशाळेच्या माध्यमातून तक्रार निवारण: तृतीयपंथीयांच्या तक्रारींचे जलद आणि प्रभावी निवारण करणे, कायदेशीर मार्गदर्शन: त्यांना त्यांच्या अधिकारांसंदर्भात कायदेशीर माहिती देणे, ओळखपत्र वाटप: तृतीयपंथीयांना त्यांची अधिकृत ओळखपत्रे मिळवून देण्यासाठी प्रक्रिया राबविणे, सर्वांगीण विकास: त्यांच्या समस्यांचा सखोल अभ्यास करून त्यावर उपाययोजना सुचविणे, या गोष्टींवर भर देण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg