loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड तालुक्यातील कुरवळ जावळी दत्तवाडीचे सुपुत्र मेजर रूपेश जाधव यांची लेफ्टनंट कर्नल पदावर पदोन्नती

खेड (प्रतिनिधी) - रत्नागिरी जिल्हयातील खेड तालुक्यातील कुरवळ जावळी (दत्तवाडी) या छोट्याशा गावातील सुपुत्र रुपेश मनोहर जाधव यांची भारतीय सैन्य दलातील 'लेफ्टनंट कर्नल' (Lt Col) या वरिष्ठ पदावर पदोन्नती झाली आहे. जोधपूर येथे पार पडलेल्या या सोहळ्यात एक अत्यंत भावूक आणि अभिमानास्पद प्रसंग पाहायला मिळाला. या पदोन्नती सोहळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे रुपेश जाधव यांचे वडील निवृत्त हवालदार मनोहर चंद्रू जाधव आणि त्यांच्या मातोश्री मनीशा मनोहर जाधव स्वतः जोधपूर येथे उपस्थित होत्या. आपल्या मुलाच्या खांद्यावर "लेफ्टनंट कर्नल" पदाचे स्टार्स आपल्या हातांनी लावताना या माता-पित्याचा ऊर अभिमानाने भरून आला होता. एका निवृत्त सैनिकासाठी आपल्या मुलाला आपल्यापेक्षा वरच्या पदावर पाहण्यासारखा दुसरा मोठा आनंद नाही. अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रुपेश जाधव यांचा प्रवास - यशाचा प्रवास आणि पार्श्वभूमी १३ एप्रिल २०१३ रोजी रुपेश जाधव भारतीय सैन्य दलाच्या 'आर्मी मेडिकल कोअर' (AMC) मध्ये 'लेफ्टनंट' म्हणून रुजू झाले होते. गेल्या १३ वर्षांच्या प्रदीर्घ कार्यकाळात त्यांनी देशाच्या विविध दुर्गम भागांत पूर्ण निष्ठेने सेवा बजावली आहे. मूळ गाव: कुरवळ जावळी, ता. खेड, जि. रत्नागिरी, पालक: निवृत्त हवालदार मनोहर चंद्रू जाधव, सेवा काळ: १३ वर्षांची समर्पित देशसेवा, सध्याची नियुक्ती: जोधपूर, राजस्थान, एका छोट्याशा गावातून येऊन, अत्यंत खडतर मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर लष्करातील या वरिष्ठ पदापर्यंत मजल मारल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. रुपेश जाधव यांचा हा प्रवास ग्रामीण भागातील तरुणांसाठी एक मोठी प्रेरणा ठरणार आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg