loader
Breaking News
Breaking News
Foto

ओडिसामधून नोकरीसाठी आलेल्या तरुणीला वेश्याव्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला

ठाणे (प्रतिनिधी) - ओडिसा येथून नोकरीच्या शोधासाठी ठाण्यात आल्यानंतर एका तरुणीला एका खोलीत डांबून ठेवीत वेश्याव्यवसायासाठी तयार करण्याचा प्रयत्न केल्यानंतर तरुणीने याला विरोध करताच तिला त्रास देण्यात आला. अखेर संधी मिळताच तरुणीने पोलिसांच्या हेल्पलाईन ११२ वर कॉल करून स्वतःची सुटका करून घेतली. या प्रकरणी चितळसर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून सुटका झालेली फरिदा खातून (२०) हिला महिला सुरक्षा गृहात व्यवस्था करण्यात आली. असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ठाणे पोलिसांच्या हेल्पलाईनचा फोन ९ एप्रिल, २०२६ रोजी ओडिसा येथून नोकरीच्या शोधात आलेल्या फरिदाखातून दीपककुमार बेहेरा (२०) हिच्या मुळ गावाच्या बाजूला राहणार्‍या महिला आरती बेहेरा व त्यांच्या कुटुंबासह ठाण्यात आली होती. नोकरीच्या शोधात असलेल्या फरिदाखातून हिने आरती बेहेराकडे मदत मागितली असता, जास्त पैसे कमवायचे असतील तर गंदा काम करावे लागेल, असा सल्ला देण्यात आल्याचे समोर आले. ही बाब न पटल्याने तिने तातडीने पोलिसांशी संपर्क साधला.

टाईम्स स्पेशल

बीट मार्शल घटनास्थळी पोहोचून संबंधितांना पोलिस ठाण्यात घेऊन आले. चौकशीत तरुणीने कोणताही गैरप्रकार झालेला नसल्याचे सांगितले. तसेच रूम मालक संतोष राऊळ व आरती बेहेरा आणि मनोज बेहेरा यांच्याकडूनही माहिती घेण्यात आली. सदर तरुणीची महिला सुरक्षा गृहात व्यवस्था करण्यात आली असून तिच्या पालकांना याबाबत कळविण्यात आले आहे. अशी माहिती चितळसर मानपाडा पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सुनील वरुडे यांनी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg