मालवण (प्रतिनिधी) - विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने बॅ. नाथ पै सेवांगण संचलित साने गुरुजी वाचन मंदिर येथे वाचन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून वाचन संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे प्रतिपादन डॉ. ज्योती पुरस्कार यांनी बॅ. नाथ पै सेवांगण येथे बोलताना केले.
सामाजिक न्याय विभाग सिंधुदुर्ग बार्टी व बॅ. नाथ सेवांगण मालवण यांच्यावतीने सामाजिक समता सप्ताह कार्यक्रमांतर्गत साने गुरुजी वाचन मंदिर येथे सलग वाचन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी तोरसकर या बोलत होत्या. यावेळी पत्रकार अमित खोत, बार्टीचे मालवण समतादूत संग्राम कासले, डी.एड कॉलेज प्रा. नागेश कदम, प्रा. आनंदी घोगळे, प्रा. पूर्वा शिरसाट, समाज कल्याण विभागाच्या शिल्पा अमरे, चैत्राली फाटक, ग्रंथपाल ऋतुजा केळकर, प्रसाद यंदे, दिलीप रेडकर, नरेंद्र जामसांडेकर, गौरी केळूस्कर आधी उपस्थित होते.
सलग वाचन उपक्रमात विद्यार्थ्यांना साने गुरुजी वाचन मंदिर येथील उपलब्ध पुस्तकांचे वाचन करायचे होते. त्यानुसार डी.एड कॉलेज मालवणच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी होत वाचनालयातील पुस्तकांचे वाचन केले. यावेळी प्रा. नागेश कदम यांनी बुद्ध अँड इज धम्म या पुस्तकाबाबतचे विवेचन केले. तर प्रा. ज्योती तोरसकर यांनी महात्मा फुले जयंतीच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समतादूत संग्राम कसले यांनी केले.


























































1.jpg)





































.jpg)











































































































































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)






















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.