loader
Breaking News
Breaking News
Foto

शिरोडा येथे ७ कोटींची "ब्ल्यू व्हेल माशाची उलटी" जप्त : मुद्देमालासह चौघे जण ताब्यात

वेंगुर्ले : शिरोडा परिसरात दुर्मिळ मानल्या जाणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी किंमत असलेल्या 'अंबरग्रीस'ची (ब्लू व्हेल माशाची उलटी) बेकायदेशीर विक्री करण्याचा प्रयत्न वनविभागाच्या सतर्कतेमुळे उधळून लावला आहे. वेंगुर्ले तालुक्यात वनविभागाने ही मोठी कारवाई १६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी करून रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. या धाडसी कारवाईत सुमारे ९.१२० किलो वजनाचे अंबरग्रीस जप्त करण्यात आले असून, याची बाजारपेठ मध्ये किंमत अंदाजे तब्बल ७ कोटी रुपये आहे. या प्रकरणी चार जणांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे या भागात एकच खळबळ उडाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​शिरोडा परिसरात काही व्यक्ती अंबरग्रीसची विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. शिरोडा परिसरामध्ये वन्यप्राणी ब्लू व्हेल (अनुसुची १) प्राण्याचा पदार्थ उलटी (अंबरग्रीस) बेकायदेशीर रित्या जवळ बाळगून त्याची विक्री करणार असल्याचे श्री सचिन शिडतुरे, वनक्षेत्रपाल फिरते पथक सावंतवाडी यांना समजले. त्यांनी गुरुवारी सायंकाळी श्री. मिलीश शर्मा उपवनसंरक्षक सावंतवाडी, श्री संजय वाघमोडे विभागीय वनअधिकारी दक्षता कोल्हापूर, डॉ. सुनिल लाड सहाय्यक वनसंरक्षक सावंतवाडी यांचे मार्गदर्शनाखाली नियोजन करून तसेच काही टिम तयार केल्या. वनक्षेत्रपाल फिरते पथक व वनपरिक्षेत्र कुडाळ मधील स्टाफ समवेत बनावट ग्राहक तयार करून सापळा रचण्यात आला त्यानुसार सायंकाळी सात च्या सुमारास वन्यप्राणी ब्लू व्हेलची उलटी बेकायदेशीर रित्या बाळगले प्रकरणी वनगुन्ह्याची कारवाई करून शिरोडा, ता. वेंगुर्ला परबगाव येथील रणजित रामचंद्र नायर, वय ४० वर्षे, रा. परबगाव शिरोडा, गुरुनाथ नाईक वय ७० वर्षे रा. परबगाव शिरोडा, विभव आडारकर, वय ३५ वर्षे, रा. शिरोडा ता. वेंगुर्ला आणि निलेश मनोहर पांडजी वय ३३ वर्षे, रा. रेडी. ता. वेंगुर्ला यांना संशयीत आरोपी म्हणून अटक करण्यात आलेली आहे. त्या बरोबर त्यांच्या ताब्यातून ९.१२० कि.ग्रॅ. वजनाचे अंबरग्रीस जप्त करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

सदरचे अंबरग्रीस आरोपी १ ते ४ यांना सुमारे ७ कोटी रुपये किंमतीस विक्री करावयाची होती. ब्लू व्हेल माशाची उलटीस आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मोठी मागणी व किंमत असल्याने पैशांच्या लोभापायी अशा स्वरूपाचे वनगुन्हे सध्या उघडकीस येत आहेत. त्यामुळे अशा प्रकारचे अंबरग्रीस अथवा वन्यप्राण्याचे मृगयाचिन्ह, उपपदार्थ आढळून आल्यास त्याबाबत तात्काळ लगतचे वनाधिकारी यांना कळविण्यात यावे असे आवाहन वनक्षेत्रपाल फिरते पथक सावंतवाडी यांनी केले आहे. ​सदरची कारवाई सचिन शिडतुरे वनक्षेत्रपाल फिरते पथक, अमित कटके, वनक्षेत्रपाल संशोधन दोडामार्ग, सावळा कांबळे, वनपाल मठ, महेश पाटील, वनपाल फिरते पथक, ब्रम्हकुमार भोजने, वनरक्षक तुळस, संग्राम पाटील, वनरक्षक आंबोली, अनिकेत माने, वनरक्षक माणगाव, रविंद्र पाटील, वनरक्षक फिरते पथक, श्रीम. रिषीका होले, वनरक्षक फिरते पथक, नितीन सावंत, चालक वनविभाग यांनी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

वेंगुर्ले तालुक्यात वनविभागाची मोठी कारवाई

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg