केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा शहराच्या अत्यंत महत्वाचा ठरलेला आणि बरेच दिवस रखडलेला अग्निशमन वाहनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. 90 लाख रूपयांचा वाहन खरेदीचा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. प्रशाकीय मान्यता मिळाली असुन शासनस्तरावरून निविदा काढण्यात आल्यानंतर अग्निशमन वाहन लांजा नगरपंचायतीच्या ताब्यात मिळणार आहे. आमदार किरण सामंत यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे अग्निशमन वाहनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी 90 लाखाचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. यामध्ये शासनाकडून 81 लाख रूपये वाटा आणि नगपंचायतकडून 9 लाख रूपये वाटा असे एकूण 90 लाख रुपय अग्निशमन बंब खरेदीसाठी खर्च करण्यात येणार आहेत. अग्निशमन वाहन खरेदीसाठी शासनाकडून निविदा काढण्यात आली नसल्यामुळे काम रखडले आहे. लांजा नगरपंचायतीने पाठवलेल्या प्रस्तावाला वर्षभरापूर्वीच मंजुरी मिळाली आहे. राज्य अग्निशमन संचालय यांचेकडे नगरपंचायत वतीने लेखी पाठपुरावा करण्यात आला आहे. याकामी आमदार किरण सामंत हे ही पाठपुरावा करीत असल्याची माहीती लांजा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिजीत कुंभार यांनी दिली.
दिला
लांजा कुवे शहर झपाट्याने वाढत आहे. शहरात आगीच्या घटना आधी घडल्या आहेत. आतापर्यंत आपत्कालीन घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी राजापूर कींवा रत्नागिरी येथुन अग्निशमन वाहन मागवावा लागत होता. मात्र अंतर लांब असल्यामुळे बंब यायला विलंब होत असल्याने काहीच उपयोग होत नव्हता. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून अग्निशमन वाहन लांजा तालुक्यात असणे अनिवार्य होते. लांजा तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पहाता स्वतंत्र अग्निशमन वाहनाची गरज होती. तशी मागणीही जनतेतून केली जात होती. काही तांत्रिक कारणामुळे गेली बरेच वर्ष अग्निशमन वाहनाचा प्रश्न रखडलेला होता. आता प्रशासकीय मान्यता मिळाल्यामुळे सदरचा प्रश्न सुटला आहे. आमदार किरण सामंत यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे प्रशासकीय अडथळे दुर होऊन आवश्यक ती शासकीय पूर्तता लवकरच पुर्ण होऊन लांजाला स्वत:ची अग्निशमन यंत्रणा मिळणार आहे.















.jpg)


















































































































































































































1.jpg)





































.jpg)













































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.