खेड (प्रतिनिधी) : खेड नगरपरिषद हद्दीतील गुलमोहर पार्क खेळाचे मैदान ते कचरा डेपो (वाय जंक्शन) दरम्यानच्या रस्त्याच्या विकासकामाचे भूमिपूजन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. सुमारे ४ कोटी ३२ लाख ६५ हजार रुपये अंदाजपत्रीय रकमेच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे शहराच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे. या कार्यक्रमाला खेडच्या नगराध्यक्ष माधवीताई बुटाला, शहरप्रमुख कुंदन सातपुते, जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण यांच्यासह नगरपरिषद सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. भूमिपूजन सोहळ्याला नागरिकांनीही मोठा प्रतिसाद दिला.
यावेळी मार्गदर्शन करताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले की, या रस्त्याच्या विकासामुळे शहरवासीयांना भेडसावणारी गैरसोय मोठ्या प्रमाणात दूर होणार आहे. विशेषतः वाय जंक्शनमुळे खेड शहराचा खाडीपट्टा विभागाशी थेट संपर्क प्रस्थापित होणार असून वाहतूक सुलभ होईल. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न असून, आगामी काळात खेड शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये आणखी सुधारणा करण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या वाय जंक्शनमुळे शहराबाहेरील परिसरातील जागांचे दर वाढल्याची माहिती खेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी यावेळी दिली. या प्रकल्पामुळे स्थानिक नागरिकांसह शहरवासीयांमध्ये समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.















.jpg)


















































































































































































































1.jpg)





































.jpg)













































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.