loader
Breaking News
Breaking News
Foto

मुरबाड अपघातात एकाच कुटुंबातील तिघा भावंडावर काळाचा घाला

कल्याण - कल्याण तालुक्यातील रायते पुलाजवळ झालेल्या भीषण अपघाताने काल पर्हे-कांदळी गावातील एका कुटुंबातील तीन भावंडांचा मृत्यु झाला. स्नेहा मोहपे, मानसी मोहपे आणि प्रथमेश मोहपे या तिघा सख्या भावंडांचा मृत्यू झाला. या मुलांच्या वडिलांचे काही महिन्यापूर्वी तीर्थस्थानाला जाताना मृत्यू झाला होता. मोहपे कुटुंबातील ही तिन्ही भावंडे आपल्या आई अंजना मोहपे यांच्यासोबत राहत होती. अंजना मोहपे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही हार न मानता घरकाम करून आपल्या मुलांचे संगोपन आणि शिक्षणाची जबाबदारी सांभाळली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दिवस-रात्र कष्ट करत त्यांनी आपल्या मुलांना उभे करण्याचा ध्यास घेतला होता. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी शिक्षणात पुढे जावे, स्वतःच्या पायावर उभे राहावे, अशी स्वप्ने या तिन्ही भावंडांच्या डोळ्यांत होती. आईच्या कष्टाचे चीज करायचे, तिचे आयुष्य सुसह्य करायचे, या निर्धाराने ही तिन्ही मुले दिवा आणि ठाणे येथे शिक्षण घेत होती. सोमवारी तीन मुलांच्या अपघाती निधनाने मुरबाड तालुक्यातील पर्‍हे गावात शोककळा पसरली सोमवारी पर्‍हे ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी त्यांचे रात्री गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg