loader
Breaking News
Breaking News
Foto

एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मिडियम स्कूल आबलोली शाळेचे ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेमध्ये उज्वल यश

आबलोली (संदेश कदम) - गुहागर तालुक्यातील आबलोली येथील एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मिडियम स्कूलने ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेतमध्ये इयत्ता पहिलीतील विद्यार्थी तेज तेजस केंबळे याने 100 पैकी 67 गुण, इयत्ता पहिलीतील श्रेया सचिन सोनवलकर हिने 100 पैकी 62 गुण मिळवून उज्वल यश संपादन केले आहे. इयत्ता तिसरीतील शौर्य संजय राठोड याने 100 पैकी 67 गुण, हर्षिता नरेंद्र रहाटे हिने 100 पैकी 67 गुण मिळवून सुयश संपादन केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सचिन बाईत, सेक्रेटरी स्नेहल बाईत व शाळेच्या मुख्याध्यापिका नेत्रा रहाटे यांनी या सर्वांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या तसेच या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे सचिनशेठ बाईत, स्नेहल बाईत यांनी अभिनंदन केले. यावेळी मुख्याध्यापिका नेत्रा रहाटे, दामोदर गोणबरे, शर्मिष्ठा साळुंखे, शितल सोनवलकर, शमीम मुल्ला, प्रांजली शिगवण तसेच तेजस केंबळे आदी. उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg