loader
Breaking News
Breaking News
Foto

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती भाजपा पनवेल तालुका व शहर मध्यवर्ती कार्यालयात उत्साहात साजरी

पनवेल - भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका व शहर मध्यवर्ती कार्यालयात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात जयंती कार्यक्रम साजरा करण्यात आला. भाजपचे राज्य परिषद सदस्य व ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत, रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महापालिकेचे महापौर नितीन पाटील, पनवेल शहर मंडल अध्यक्ष व नगरसेवक सुमित झुंझारराव, नगरसेवक अजय बहिरा, रुपेश नागवेकर, हेमंत माने, सचिन दिसले, अशोक आंबेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी उपस्थितांनी बाबासाहेबांच्या कार्याचा व विचारांचा गौरव करत त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व घटनात्मक योगदानाची आठवण करून दिली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अनुकरण करून समाजातील सर्व घटकांच्या प्रगतीसाठी कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच त्यांच्या समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचे पालन करण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला. यावेळी बाबासाहेबांचा जयजयकार जयघोष करण्यात आला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg