पनवेल (जितेंद्र गावडे) :- पनवेल शहराच्या सुशोभीकरणात भर घालणाऱ्या 'ऑक्सिपार्क' या सार्वजनिक उद्यानांमधील झाडांवर आता जाहिरातदारांनी डल्ला मारण्यास सुरुवात केली आहे. तक्का पेट्रोल पंपासमोरील सिग्नलजवळ असलेल्या उद्यानातील पाच झाडांची अनधिकृतपणे छाटणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार आज सोमवारी उघडकीस आला. जाहिरातीचे होर्डिंग प्रवाशांना स्पष्ट दिसावे, या स्वार्थापोटी ही झाडे छाटली गेल्याचा संशय तक्रारदाराने व्यक्त केला असून, या प्रकरणी महापालिकेने तातडीने पंचनामा केला आहे. या ऑक्सिपार्कमुळे नागरिकांना एक सामुदायिक, शांत आणि नैसर्गिक वातावरण मिळाले होते. तसेच, पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत प्रभावी ठरला होता. उड्डाणपुलाजवळ वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या या उद्यानामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधले जात होते आणि शहराच्या सकारात्मक बदलाचे प्रतीक म्हणून ते ओळखले जाऊ लागले. मात्र, काही अज्ञात व्यक्तींनी या उद्यानातील झाडांची तोड करून पर्यावरणाचे मोठे नुकसान केले आहे.
ही घटना अत्यंत निंदनीय असून समाजहिताला बाधा आणणारी आहे. अशा कृत्यांमुळे केवळ पर्यावरणाचाच नव्हे तर सामाजिक उपक्रमांवरही परिणाम होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.यामुळे निसर्गप्रेमी नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवार, १३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०:४० च्या सुमारास तक्का पेट्रोल पंपासमोरील उद्यानात वृक्षछाटणी झाल्याचे स्थानिक नागरिक आणि तक्रारदार रोहित आटवणे यांच्या निदर्शनास आले. या उद्यानातील ४ 'तबुबिया' आणि १ 'सप्तपर्णी' अशा एकूण ५ झाडांच्या फांद्या आणि शेंडे मोठ्या प्रमाणात निर्दयीपणे छाटण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या झाडांच्या अगदी मागे एक मोठे जाहिरातीचे होर्डिंग आहे.
झाडांच्या वाढलेल्या फांद्यांमुळे हे होर्डिंग झाकले जात होते. आपली जाहिरात लोकांच्या नजरेस पडावी यासाठी संबंधित होर्डिंग मालकानेच ही वृक्षछाटणी केली असावी, असा प्राथमिक संशय तक्रारदाराने अर्जात नमूद केला आहे. घटनेची माहिती मिळताच पनवेल महानगरपालिकेच्या उद्यान विभागातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सकाळी १०:५५ वाजता प्र. अधिक्षक संदीप पवार, विवेक दळे, प्रविण भोईर आणि नितीन बाबुळे यांनी तक्रारदार रोहित आटवणे व साक्षीदार तुषार कापरे यांच्या उपस्थितीत या घटनेचा सविस्तर पंचनामा केला. भररस्त्यात आणि वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या बागेतील झाडांची अशा प्रकारे छाटणी झाल्याने पर्यावरण प्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आता या प्रकरणी दोषी असलेल्या होर्डिंग मालकावर महापालिका काय कठोर कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

































































































1.jpg)





































.jpg)











































































































































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)

























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.