गावखडी (वार्ताहर) - रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा मेर्वी शाळेत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या प्रारंभीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार मेर्वी शाळेचे मुख्याध्यापक हिदायत भाटकर यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक हिदायत भाटकर, विषय शिक्षिका शर्वरी करगुटकर, उपशिक्षक चंद्रशेखर पेटकर, ऐश्वर्या गुरव, शालेय मुख्यमंत्री मैत्रेयी अभ्यंकर, उपमुख्यमंत्री रचित म्हादये आणि सर्व विद्यार्थी यांची उपस्थिती लाभली होती.
या कार्यक्रमात मेर्वी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भाषणे केली. त्याचप्रमाणे मुख्याध्यापक हिदायत भाटकर, विषय शिक्षिका शर्वरी करगुटकर, उपशिक्षक चंद्रशेखर पेटकर आदींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंग आपल्या मार्गदर्शनातून कथाकथन केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वेशभूषेतील भूमिका इयत्ता पाचवीतील विद्यार्थी आराध्य सिद्धार्थ पावसकर या विद्यार्थ्याने अतिशय सुंदररित्या साकारली होती. सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ही भूमिका या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य होते. शेवटी करगुटकर मॅडम यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता झाली.















































































































































1.jpg)





































.jpg)











































































































































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)



























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.