दापोली (प्रतिनिधी) - भरधाव वेगात असलेल्या एका टेम्पो ट्रॅव्हलर्सवरील चालकाचा ताबा सुटल्याने दापोलीकडे जाणारी टेम्पो ट्रॅव्हल रस्ता सोडून थेट खोल दरीत कोसळली. ही घटना चाचवळ गावाच्या हद्दीत सोमवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या टेम्पो ट्रॅव्हलस मधून पर्यटनासाठी आलेले १२ पर्यटक प्रवासी त्यांचे दैव बलवत्तर म्हणून बालंबाल वाचले. मुंबई बोरवली येथून दापोली येथे पर्यटनासाठी टेम्पो ट्रॅव्हलमधून येणा-या पर्यटकांच्या टेम्पो ट्रॅव्हलरवरील वाहन चालकाचा ताबा सुटल्याने दापोलीकडे पर्यटकांना स्टेसाठी घेऊन जाणारी टेम्पो ट्रॅव्हल चाचवळ हद्दीत एका वळणावर थेट दरीत कोसळून अपघात झाला. हा अपघात रात्रीच्या वेळी झाल्याने आणि सगळीकडे दाट अंधार असल्याने पर्यटनासाठी आलेले पर्यटक मोठयाच संकटात सापडले होते. त्यातील अनेकांनी आरडा ओरडा केल्याने या मार्गावरुन जाणारे काही जण थांबले आणि त्यांनी टेम्पो ट्रॅव्हलमध्ये अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढत माणुसकीचे दर्शन घडवले.
या अपघतात अपघातात चालकाला किरकोळ दुखापत झाली असून ट्रॅव्हल मधील 12 पर्यटक प्रवासी त्यांच्या सुदैवाने त्यांना कोणत्या प्रकारची दुखापत झालेली नाही हे त्यांचे सुदैव म्हणावे लागेल. दापोली येथील समुद्र किनाऱ्यावर पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना समुद्र किनाऱ्यावरील मोकळी सपाट जागा दिसतात. येथे आलेले अनेक पर्यटक हे समुद्र किनाऱ्यावर भरधाव वेगाने वाहने हाकत असतात. अशांना समज देऊन देखील असे निर्ढावलेले पर्यटक कोणाचेही ऐकत नाहीत. अशांपैकी अनेकांची वाहने समुद्राच्या पाण्यात तसेच पुळणीत फसलेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याचप्रमाणे येथील अरुंद आणि नागमोडी वळणाच्या रस्त्यावरून वाहने चालवताना अनेक जण रस्त्याचा अंदाज न घेताच भरधाव वेगाने वाहने हाकत असतात तशाच प्रकारे कालच्या घटनेत झाले आहे.
दापोली आंजर्ले मार्गाचा विचार न करता भरधाव वेगाने वाहन चालवून रस्त्यावरील वळणाचा अंदाज न आल्याने स्वतः बरोबरच टेम्पो ट्रॅव्हल मधील पर्यटक प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्याचे काम वाहन चालकाकडून झाले होते. या मार्गावर वाढलेली वाहनांची वर्दळ त्यातच आडवळणाच्या रस्त्यांमुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे प्रवासाठी आलेल्यांनी तसेच पर्यटकांनी वाहन चालकांनी खबरदारी घेऊनच येथील रस्त्यावरून वाहने सावकाश चालवणे आवश्यक आहे. आपल्या चुकांमुळे स्वतःबरोबरच इतरांचा जीव धोक्यात घालू नये.























































































































































1.jpg)





































.jpg)











































































































































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)



























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.