loader
Breaking News
Breaking News
Foto

माजी आम. परशुराम उपरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना बळकट करूया: वैभव नाईक

कणकवली (प्रतिनिधी) - कोणत्याही अमिषाला बळी न पडता माजी आम. परशुराम उपरकर हे शिवसेना पक्षाशी निष्ठावंत राहिले. स्वतःला काहीतरी मिळाले पाहिजे असा विचार त्यांनी कधीही केला नाही. पक्ष वाढीसाठी त्यांची सातत्याने धडपड सुरु असते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुन्हा एकदा शिवसेना वाढविण्याचे काम करूया असे प्रतिपादन माजी आम. वैभव नाईक यांनी करत माजी आमदार परशुराम उपरकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. माजी आम. परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली येथील भगवती हॉल येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीर घेण्यात आले. या आरोग्य शिबिराचे उदघाटन माजी आम. वैभव नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. माजी आम. परशुराम उपरकर यांना शाल व पुष्पहार घालून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी विविध आजारांवर तपासणी करण्यासाठी बी. के.एल. वालावलकर रुग्णालय डेरवण चिपळूणची वैद्यकीय टीम उपस्थित होती. नगराध्यक्ष संदेश पारकर म्हणाले, परशुराम उपरकर हे लढाऊ व्यक्तिमत्व असून वाढदिवसानिमित्त विविध समाजपयोगी उपक्रम ते राबवितात. जिल्ह्यातील प्रश्नांवर आवाज उठवून अन्यायाविरुद्ध लढण्याचे काम ते करीत आहेत. त्यांचे हे कार्य असेच अविरतपणे सुरु रहावे व त्यांना निरोगी व दीर्घायुष्य लाभावे अशी प्रार्थना केली. यावेळी बोलताना माजी आम.परशुराम उपरकर म्हणाले, सामाजिक, आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असताना लोकांना जे काही देणे शक्य आहे ते देत राहण्याचा प्रयत्न मी करीत आहे. शिवसैनिकांना साथ देऊन शिवसेना संघटना पूर्ववत करण्याचा वाढदिवसानिमीत्त मी संकल्प करत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अभिप्रेत असलेली संघटना पुन्हा एकदा उभी करूया असे त्यांनी सांगितले.

टाईम्स स्पेशल

शिवसेना महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव यांनी परशुराम उपरकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प. पू. भालचंद्र महाराज व श्री देव स्वयंभू चरणी प्रार्थना केली. यावेळी नगरसेवक रुपेश नार्वेकर, लुकेश कांबळे, संतोष सावंत, चंद्रशेखर उपरकर, विलास गुडेकर, किरण हुन्नरे, समीर परब, जगन्नाथ आजगावकर, राजू कोरगावकर, संजय बेलवलकर, प्रवीण कोरगावकर, पप्पू कोरगावकर, संदीप म्हाडगूत, शैलेश नेरकर, प्रमोद सावंत, उमेश हजारे, पुरुषोत्तम तारी, निलेश चव्हाण, डेरवण रुग्णालयाचे डॉ. अमित वालावलकर, डॉ. क्रिशांत दिवाटे, डॉ. पूजा गीते, डॉ. आकाश राऊळ, अमित वैद्य आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg