loader
Breaking News
Breaking News
Foto

रक्तदानाबरोबरच अवयव दान करा, ही काळाची मोठी गरज - ज्येष्ठ सिने अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी-मोने

रक्तदानाबरोबरच अवयव दान करा त्याचे फॉर्म भरा अवयव दान करण्याची खूपच आवश्यकता आहे असा महत्त्वाचा संदेश ज्येष्ठ अभिनेत्री सुकन्या मोने कुलकर्णी यांनी दिला. तुम्हाला हे मी सांगताना आपण सुद्धा अवयव दानासाठी फॉर्म रजिस्टर केला आहे असं त्या म्हणाल्या. पुण्यातील स्पर्श नावाची संस्था आहे ती अवयव दानासाठी मोठं काम करत आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. सुकन्या कुलकर्णी मोने बुधवारी 15 एप्रिल रोजी दापोली दौऱ्यावर आल्या होत्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीनिमित्त दापोली शहरातील कोकंबाआळी येथील श्री स्वामी समर्थ मठात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं त्याचे उद्घाटन सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी मोने यांच्या हस्ते श्री स्वामींची आरती करून करण्यात आलं. यावेळी दापोलीच्या नगराध्यक्षा कृपा घाग, श्री स्वामी समर्थ ध्यान मंदिराचे श्रीकृष्ण अनंत भागवत ,मनोज गुरव, राकेश पिंपळे, प्रफुल्ल खोत, प्रवीण शेठ, रमेश कडू, चारुदत्त सातारकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थित स्वामी भक्तांजवळ संवाद साधला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg