loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा येथे दुचाकीला अचानक आग

लांजा (संजय साळवी) - शहरातील श्रीराम पुलाजवळ एका ऍक्टिवा दुचाकी अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे बाजारपेठ परिसरात एकच खळबळ उडाली होती. मात्र ही दुचाकी नेमकी कोणाची आहे आणि तिने कोणत्या कारणांमुळे पेट घेतला हे अद्याप गुलदस्त्यात राहिले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, एक दुचाकीस्वार बाजारपेठेतून गॅस सिलेंडर घेवून जात होता. श्रीराम पुलावरून खाली उतरून पुढे वैभव वसाहतीच्या दिशेने जात असताना त्याच्या दुचाकीने अचानक पेट घेतला. प्रसंगावधान राखत संबंधित दुचाकीस्वाराने तात्काळ गॅस सिलेंडर उचलून दुचाकीपासून दूर केला आणि स्वतःचा जीव वाचविला. यानंतर काही क्षणांतच दुचाकीने पूर्णतः पेट घेतला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला, मात्र आग इतक्या वेगाने पसरली की काही वेळातच दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली. दरम्यान, भर दुपारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी गर्दी झाली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, गॅस सिलेंडर वेळेत दूर केल्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg