खेड (प्रतिनिधी) - मंथन सामान्य ज्ञान परीक्षेत जिल्हा परिषद शाळा शिरवली गुरववाडी शाळेची विद्यार्थिनी आर्या अनिल कदम हिने इयत्ता दुसरी या वर्गातून जिल्हा गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक तर राज्य गुणवत्ता यादीत सहावा क्रमांक पटकावून यश संपादन केले आहे. शिरवली गुरववाडी शाळेची विद्यार्थिनी आर्या अनिल कदम हिने जानेवारीमध्ये झालेल्या मंथन सामान्य-ज्ञान परीक्षेमध्ये 150 पैकी 140 गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत पहिला येण्याचा तर राज्य गुणवत्ता यादी सहावा येण्याचा मान पटकावला आहे.
जिल्हा परिषद शाळेच्या गुणवत्तेबाबत शंका उपस्थित करताना अनेकजण टीका करत असतात. मात्र, ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा आजही गुणवत्ता टिकवून आहे. याचेच उदाहरण म्हणजे शिरवली गुरववाडी शाळेची होत असलेली प्रगती. याच शाळेचा माजी विद्यार्थी श्रेयस संतोष सुतार यांनी शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेमध्ये यश मिळवून जवाहर नवोदय विद्यालयात त्याने प्रवेश मिळवला आहे. तर निरज नारायण साळुंखे व श्रेयस संतोष सुतार यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे.
आयुष अशोक काणेकर यांनी 300 पैकी 216 गुण प्राप्त केलेले आहे. तसेच धीरज नारायण साळुंखे इयत्ता चौथी हा सुद्धा मंथन ज्ञान परीक्षेमध्ये पात्र झालेला आहे. या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक मिलिंद नलावडे, उपशिक्षिका अनिता देवरे यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील कदम तसेच सर्व सदस्य ग्रामस्थ, विस्ताराधिकारी सुनील वरेकर, केंद्रप्रमुख अंकुश उंडे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

























































































1.jpg)





































.jpg)











































































































































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)
























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.