loader
Breaking News
Breaking News
Foto

मोहोपाड्यात सकल हिंदू संमेलनात हिंदुत्वाचा जागर

रसायनी (राकेश खराडे) - मोहोपाडा येथील जनता विद्यालयाच्या प्रांगणात सकल हिंदू संमेलन संध्याकाळी पार पडले. प्रमुख पाहुणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह कृष्णगोपालजी होते. स्वागताध्यक्ष ह.भ.प. वामन महाराज भोईर यांच्याहस्ते प्रमुख पाहुणे व मान्यवरांना तुळशीचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे कृष्णगोपालजी, ह.भ.प.वामन महाराज भोईर, ह.भ.प.सच्चिदानंद कांबेकर, देवेंद्र भोजने, डाॅ.सागर कांबळे, रजनी गायकवाड, ललिता दळवी, ताई पवार उपस्थित होते. तर कार्यक्रमासाठी तालुका पंचायत समितीचे सभापती कृष्णा पारंगे, सरपंच उमाताई मुंढे, जि.प.सदस्या नेहा पारंगे, पंचायत समिती सदस्या अर्चना भोईर, माजी सभापती रमेश पाटील, माजी सचिन तांडेल, ग्रामपंचायत सदस्या रसिका राकेश खराडे, सदस्या प्रतिक्षा रोशन राऊत आदी मान्यवरांसह परिसरातील आंतरराष्ट्रीय बजरंग दलासह इतर हिंदू संघटना, शेकडो हिंदू समाज बांधवांची उपस्थिती होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाच्या प्रारंभी दिपप्रज्वलन करुन स्व.आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. लोधिवली येथील शिवगर्जना शस्रपथकाच्या मुला-मुलींनी दांड-पट्टा, लाठी-काठी, काकडा, ढाल- तलवार याची प्रात्यक्षिके दाखवली. प्रमुख पाहुणे कृष्णगोपालजी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, हिंदू अत्यंत उदार व धार्मिक आहे. पूर्वी तो संघटित नसल्याने देशावर परकीय आक्रमणे झाली. त्यातूनही तो सावरला. हिंदू संघटित होण्यासाठी डाॅ. केशव बळीराम हेडगेवार यांनी सन १९२५ मध्ये नागपूरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. त्याला नुकतीच १०० वर्षे पूर्ण झाली. हिदूंनी हिंदूंची सुरक्षा केली पाहिजे.

टाईम्स स्पेशल

पर्यावरण, तरूणाची व्यसनाधीनता यावर खूप कार्य करावे लागेल हे सांगितले. शेवटी संकल्प करण्यात आला, '' मी स्वत:मध्ये चांगले गुण विकसित करून स्वआधारित जीवनशैली अंगीकारीन, कुटुंबात संस्कार व एकता वाढवून समाजात समरसता निर्माण करीन, पर्यावरणाचे रक्षण आणि राष्ट्रभक्ती जोपासत जबाबदार नागरिक म्हणून राष्ट्राच्या प्रगतीसाठी सदैव कार्यरत राहीन. आपल्या परिसरात गोहत्या व धर्मांतरण होऊ देणार नाही'' असा सांकल्पही करण्यात आला. शेवटी ह.भ.प. सच्चिदानंद कांबेकर यांनी आशीर्वचन भाषण व आभार व्यक्त केले. पसायदान गायनाने समारोप झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg