loader
Breaking News
Breaking News
Foto

भव्य ग्रामीण क्रिकेट स्पर्धेचा थरार! बोरिवली (आडीवाडी) येथे रंगणार क्रिकेटचा महासंग्राम

दापोली (सागर गोवळे) - श्री साई-सातमाई क्रिकेट संघ, बोरिवली (आडीवाडी) आयोजित ’भव्य क्रिकेट स्पर्धा २०२६’ लवकरच सुरू होत आहे. टेनिस क्रिकेटमधील दर्जेदार खेळाडू आणि अटीतटीचे सामने पाहण्याची सुवर्णसंधी क्रीडाप्रेमींसाठी उपलब्ध झाली आहे. ही स्पर्धा दि. ११ मे ते १३ मे २०२६ या कालावधीत कपिलादेवी मैदान येथे खेळविण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी २००० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात आले आहे. त्याच बरोबर या स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम आणि आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. यात १८ हजार, १० हजार, ५ हजार, ३ हजार असे अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक क्रमांक मिळविणार्‍या संघाना देण्यात येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या सोबतच काही वैयक्तिक बक्षिसेही देण्यात येणार आहेत. यामध्ये उत्कृष्ठ खेळाडू, उत्कृष्ठ फलंदाज आणि उत्कृष्ठ गोलंदाज या पारितोषकांचा समावेश आहे. या स्पर्धेत प्रथम येणार्‍या ३२ संघांनाच प्राधान्य दिले जाईल. स्पर्धेतील प्रत्येक खेळाडू हा गाव पातळीवरील असावा. एका खेळाडूला एका वेळी एकाच संघातून खेळता येईल. सामने ४ षटकांचे असतील (वेळेनुसार बदल होऊ शकतो). सामना अनिवार्य धाव पाठलाग असेल. प्रत्येक संघाने सामन्याच्या ३० मिनिटे आधी उपस्थित राहणे अनिवार्य आहे. फेकी गोलंदाजी ग्राह्य धरली जाणार नाही. आडीवाडी येथील क्रिकेट रसिकांना ३ दिवस क्रिकेटचा थरार अनुभवयाल मिळणार आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg