दापोली : बौद्धजन सेवा संघ दापोली आणि जेसीआय दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त दापोली येथील आंबेडकर गार्डन येथे भव्य महाआरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून तब्बल २५० हून अधिक रुग्णांनी विविध आरोग्य सेवांचा लाभ घेतला. शिबिरामध्ये दंतचिकित्सा, नेत्रचिकित्सा, तसेच जनरल फिजिशियनद्वारे सर्वसाधारण तपासणी (जनरल चेकअप), बीपी तपासणी आदी सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. याशिवाय, महिलांसाठी मोफत सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले. तसेच गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेची नोंदणी व मार्गदर्शन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अनुसरून आरोग्य सेवेचा लाभ समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्याचा हा एक स्तुत्य उपक्रम असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.
या शिबिराचे उद्घाटन जेसीआय दापोलीचे अध्यक्ष डॉ. कुणाल मेहता यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोकल होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व रामराजे नर्सिंग कॉलेज येथील विद्यार्थी यांच्या मार्फत उपस्थितांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. नेत्र चिकित्सा शिबिरासाठी एनएबी चिपळूण या संस्थेमार्फत डॉ.साकेत राठी, संदीप नलावडे विकास अधिकारी व वैभव फके हे उपस्थित होते. शितल लोढा फाउंडेशन तथा अभिनंदन वेंचर्स यांचे मार्फत रुग्ण तपासणी करून रुग्णांना मोफत औषधांचे वितरण करण्यात आले. त्यासाठी कोऑर्डिनेटर सुरज जाधव डॉक्टर फरहाना सय्यद यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली. ब्रह्माकुमारीस दापोली केंद्रातर्फे व्यसनमुक्ती समुपदेशन उपलब्ध करून देण्यात आले होते त्यामध्ये दापोली केंद्राच्या बीके सारिका तसेच बीके विद्या यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या सामाजिक प्रबोधनात्मक तसेच आरोग्य विषयक स्तुत्य उपक्रमासाठी बौद्धजन सेवा संघाच्या दापोली तथा मुंबई मंडळाने विशेष रुची दाखवल्यामुळे त्यांचे तालुक्यातून कौतुक होत असून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव सुरू आहे.
















































































2.jpg)





























.jpg)





























































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.