loader
Breaking News
Breaking News
Foto

तिलारी नदीपात्रातील बेकायदेशीर बंधारा हटवून संबंधिता विरोधात गुन्हा दाखल करावा - सुधीर दळवी

दोडामार्ग (प्रतिनिधी) - उन्हाळ्यात नदीमधिल पंपांना पाणी मिळावे यासाठी तिलारी नदी पाञात तेरवण मेढे उन्नेयी बंधारा मधिल पाणी सोडले जाते. तिलारी नदी पुलाखालून जाणारे हे पाणी एका व्यक्तीने बंधारा घालून अडविले आहे. पर्यावरण विषयक नियमांची पायमल्ली करून आणि संबंधित विभागाची कुठल्याही प्रकारे परवानगी न घेता तिलारी नदीपात्रात हा बंधारा बांधला आहे. या बंधाऱ्यामुळे नदीपात्रातील पाणी अडवले गेले आहे. त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे माजी तालुका प्रमुख तसेच जिल्हा चिटणीस सुधीर दळवी यांनी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या संदर्भात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनानुसार बांध घालून पाणी अडविले याचा दुष्परिणाम या पाण्यावर शेती बागायती करणाऱ्या शेतकरी कुटुंबावर झाला आहे. शिवाय पाण्याचा प्रवाह बदलून अनेकांच्या शेती बागायतीचे नुकसान होत आहे. यासंदर्भात स्थानिक तहसीलदारांकडे पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांनी कानावर हात घेत याबाबत चौकशी व कारवाईची जबाबदारी जलसंपदा खात्याची असल्याचे म्हटले आहे, तर जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला आहे.

टाईम्स स्पेशल

वास्तविक हा बंधारा बांधण्यापूर्वी संबंधिताने जलसंपदा विभाग, महसूल विभाग आणि पर्यावरण विभागाची परवानगी घेण्याची गरज आहे. मात्र, संबंधिताने कुठल्याच विभागाची परवानगी न घेता दादागिरी करून हा बंधारा बांधला आहे. नदीचा प्रवाह अडवणे हा पर्यावरण कायद्यानुसार गुन्हा आहे. जलसंपदा विभागाने या बंधाऱ्यासाठी निधी दिला आहे. कार्यकारी अभियंत्यांना याबाबत विचारले असता त्यांनी मौन पाळले. तसेच या संदर्भात उपविभागीय अधिकारी गजानन बुचडे यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. याबाबत योग्य आणि उच्च न्यायालयाकडे दाद मागणार असल्याचे सुधीर दळवी यांनी निवेदनात म्हटले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg