सावंतवाडी (प्रतिनिधी) - सावंतवाडी तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमधील रिक्त असलेल्या सरपंच आणि सदस्य पदांच्या पोटनिवडणुकीसाठी नामांकन प्रक्रिया पार पडली आहे. १३ एप्रिल पर्यंत प्राप्त झालेल्या अधिकृत अहवालानुसार, तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमधून एकूण २१ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. या पोटनिवडणुकीत विशेषतः माजगाव ग्रामपंचायतीमधील रिक्त असलेल्या सरपंचपदासाठी चार महिला उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने तिथे मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. उर्वरित ठिकाणी विविध प्रभाग आणि राखीव जागांसाठी उमेदवारांनी आपले नशीब आजमावले आहे. अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची यादी आहे. नाणोस सरपंच उमेदवार साक्षी सदानंद शेट्ये, तर नाणोस प्रभाग २ (सदस्य) विष्णू रघुनाथ कांबळी, नाणोस प्रभाग २ (सदस्य) रविंद्र भाऊराव जोशी, यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले.
माजगाव ग्रामपंचायत सरपंच उमेदवार श्रद्धा मुकुंद सावंत,रंजना रविंद्र कानसे, सपना सतीश गावडे, जयश्री दिनेश सावंत, तर माजगाव प्रभाग २ (सदस्य) अनघा प्रदीप धुरी व शिल्पा शशिकांत साळगावकर तसेच प्रभाग ४ (सदस्य) राजवी रुपेश पेडणेकर हे रिंगणात उतरले आहेत. सरपंच पदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. किनळे ग्रामपंचायत प्रभाग ३ (सदस्य) अधीन अशोक कोरगावकर. कारिवडे प्रभाग २ (सदस्य) नेहा नारायण परब. कास प्रभाग १ (सदस्य) विश्वनाथ सखाराम पंडित. शेर्ले प्रभाग १ (सदस्य) जिज्ञासा उदय तारी. निगुडे प्रभाग १ (सदस्य) समिधा समीर गावडे. रोणापाल | प्रभाग २ (सदस्य) प्रिया गंगाराम गाड. कवठणी प्रभाग ३ (सदस्य) पांडुरंग भिवा हळदणकर. विलवडे प्रभाग १ (सदस्य) भावना नंदा सावंत व गायत्री सिताराम दळवी रिंगणात उतरले आहेत. कुडतरकरटेंब प्रभाग ३ (सदस्य) महिमा महेंद्र दळवी व सुष्मिता गणेश म्हाडगुत रिंगणात उतरले आहेत.
सावंतवाडी तहसील कार्यालयाकडून ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, आता छाननी व त्यानंतर पुढील निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. ग्रामीण स्तरावरील या पोटनिवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले असून, गावगाड्याच्या राजकारणात कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान माजगाव सरपंच भाजपचे होते. त्यांच्या वर अविश्वास ठराव मंजूर झाला होता त्यामुळे ही निवडणूक लागली असून आता प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. भाजपच्या वतीने श्रध्दा सावंत यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले तेव्हा जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्मा सावंत, माजी सभापती अशोक दळवी, भाजपचे बांदा मंडल अध्यक्ष मधुकर देसाई, संजय कानसे व मान्यवर उपस्थित होते.















































































































































1.jpg)





































.jpg)











































































































































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)



























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.