खेड (प्रतिनिधी) - मंगळवार दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडमध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, दलितांचे उद्धारक भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमाची सुरुवात रोटरी स्कूलच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांच्या शुभहस्ते दीपप्रज्ज्वलन व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात शिवम चिखले, निष्ठा वाडकर, सार्थक गोवळकर, श्रवण देशमुख या विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयीची माहिती आपल्या मनोगतातून सांगितली.
रोटरी स्कूलच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, शाळेतील शिक्षक दर्पण पवार, ओंकार तांबे, अमोल नरवणकर यांनी विद्यार्थ्यांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांच्या हितासाठी दिलेले योगदान, भारतीय राज्यघटना लिहिण्यासाठी घेतलेली मेहनत, त्यांची शैक्षणिक विद्वत्ता व सामाजिक कार्य याविषयी सविस्तर माहिती सांगितली. विद्यार्थ्यांना जीवनातील महान विभूतींचे आदर्श ठेवण्याचे महत्त्व स्पष्ट केले. यावेळी माध्यमिक विभागप्रमुख शैलेश देवळेकर, प्राथमिक विभागप्रमुख तेजश्री कानडे, शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंतरा भंडारे हिने केले. संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.























































































































































1.jpg)





































.jpg)











































































































































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)



























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.