loader
Breaking News
Breaking News
Foto

इंटरनॅशनल हिंदी ऑलिंपियाड परीक्षेत रोटरी स्कूलच्या 17 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक

खेड- विज्ञान ऑलिंपियाड फाउंडेशन मार्फत घेण्यात आलेल्या इंटरनॅशनल हिंदी ऑलिंपियाड (आय.एच.ओ) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलच्या 17 विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदक पटकावून घवघवीत यश संपादित केेले. शालेय विद्यार्थ्यांसाठी हिंदी विषयावर आधारित दरवर्षी इंटरनॅशनल हिंदी ऑलिंपियाड (आय.एच.ओ) परीक्षा ही आयोजित केली जाते. या परीक्षेसाठी संपूर्ण देशभरातून अनेक विद्यार्थी प्रविष्ठ होतात. रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत प्रविष्ठ होऊन जिदद् व चिकाटीच्या बळावर अभ्यासाची उत्तम तयारी करून सुवर्ण पदकाला गवसणी घातली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

इंटरनॅशनल हिंदी ऑलिंपियाड (आय.एच.ओ) परीक्षेतील सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये कु. आरुष हरावडे, कु. आराध्या कासार, कु. अनन्या पाटील, कु. सार्थक खेडेकर, कु. विधी तटकरी, कु. स्तवन जाधव, कु. आहाना बुटाला, कु. वैभव अग्रहारी, कु. हिबा खान, कु. पारस खोपकर, कु. समर्थ खडपेकर, कु. श्रेयश आलेगावकर, कु. हर्ष सगरे, कु. परीजा कदम, कु. हेमांग मेंढे, कु. अर्णव पिल्लई, कु. स्मित तांबे या विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य सुवर्णपदक प्राप्त केले आहे. विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या यशामुळे त्यांच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेतील सर्व हिंदी विषय शिक्षकांनी मोलाचे मार्गदर्शन केले. संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वितांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg