loader
Breaking News
Breaking News
Foto

मौजे पाले येथे आरोग्य शिबिरात मोलाचे योगदान देणाऱ्या आशा सेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान

रायगड : मौजे पाले (ता. पेण, जि. रायगड) येथे दि. 13 एप्रिल 2026 रोजी आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरात मोलाचे योगदान देणाऱ्या आशा सेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. हा सन्मान सोहळा देवा ग्रुप फाउंडेशन आरोग्य विभाग तसेच BCD Health Care कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या शिबिराच्या यशस्वी आयोजनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या निलम दिनेश पाटील, मिलन कृष्णा राणे, विशाखा संतोष पाटील, निधी निलेश म्हात्रे, प्रविणा प्रविण पाटील (आशा सेविका पर्यवेक्षक), सुरेखा उमेश म्हात्रे (आरोग्य सेविका), सुधीर वामन घरत (आरोग्य सेवक) व संग्राम दिलीप जाधव (क्ष-किरण तंत्रज्ञ) यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या सर्वांनी शिबिरात अत्यंत प्रामाणिकपणे, निस्वार्थ सेवाभावाने व जबाबदारीने कार्य करत गोरगरीब व गरजू रुग्णांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी उल्लेखनीय योगदान दिले. त्यांच्या अथक परिश्रमामुळे शिबिर यशस्वीपणे पार पडले, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हा सन्मान कोकण विभाग अध्यक्ष डॉ. अनिकेत प्रदिप मेस्त्री, रायगड जिल्हा संघटक जितेंद्र जाधव तसेच पेण तालुका पदाधिकारी दिलीप चिंबोरे व समीर काडू यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी BCD Health Care चे संचालक अभिजित राय यांचीही प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी आपल्या मनोगतातून आशा सेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांचे कार्य हे समाजासाठी प्रेरणादायी असून, ग्रामीण भागात आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे नमूद केले. देवा ग्रुप फाउंडेशन मार्फत भविष्यातही अशा समाजोपयोगी उपक्रमांद्वारे जनतेची सेवा करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या सन्मान सोहळ्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढला असून, उपस्थितांकडून या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg