loader
Breaking News
Breaking News
Foto

झिराड येथे उभी राहतेय 8 लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी; परिसरातील गावांचा पाणी प्रश्न मिटणार

अलिबाग (महेश पोरे) - अलिबाग तालुक्यातील झिराड, गावासह अनेक गावांचा पाणी प्रश्न लवकरच मिटणार आहे. रायगड जिल्हा परिषद सदस्य दिलीप भोईर यांच्या पुढाकाराने झिराड येथे 8 लाख लिटर क्षमतेची टाकी उभारण्याचे काम सुरू झाले आहे. विशेष म्हणजे टाकीचा बहूउद्देशीय वापर व्हावा म्हणुन काही गाळे बांधण्यात येणार आहेत. जेणेकरून झिराड ग्रामपंचायतीला उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करण्याचा प्रयत्न त्यातून व्यक्त असेल असे दिलीप भोईर यांनी सांगितले. अलिबाग तालुक्यातील अनेक गावे ही पाणी टंचाईचा सामना गेली अनेक वर्ष करीत आहे. जलजीवन मिशन अंतर्गत योजना राबविताना पाण्याच्या नैसर्गिक स्रोत मुबलक प्रमाणात मिळत नाही. एम. आय.डी. सी. च्या पाण्यावर अवलंबून रहावे लागते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रायगड जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती आणि विद्यमान सदस्य दिलीप भोईर यांच्या संकल्पनेतून अलिबाग तालुक्यातील झिराड येथे 8 लाख लिटर क्षमतेची टाकी आणि बहू उद्देशीय इमारत उभारण्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. दिलीप भोईर यांनी झिराड आणि परिसरातील गावांचा पाणी प्रश्न संपुष्टात आणण्याचा संकल्प सोडला होता. आणि तो पूर्णत्वास नेण्यासाठी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. पाणी पुरवठ्याबरोबरच झिराड ग्रामपंचायतीचा उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे दिलीप भोईर यांनी सांगितले. या पाण्याचे वर्गीकरण करताना झिराड गावासह आवास जिल्हा परिषद मतदार संघातील शेवटचे गाव असलेले बागदांडा या गावापर्यंत पाणी पोहचवायचे आहे, असे दिलीप भोईर म्हणाले.

टाईम्स स्पेशल

उन्हाळ्याच्या दिवसांत अलिबाग तालुक्यातील समुद्राच्या किनारी वसलेली गावे आणि डोंगर भागातील गावांना प्रचंड पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. गेली अनेक वर्ष एमआयडीसी हा एकच पर्याय असल्याने गावकरी पाणी विकत घेऊन आपली तहान भागवतात. राजकीय पुढारी आणि जिल्हापरिषद यांच्या माध्यमातून टँकर द्वारे पाणी देण्याचा उपक्रम हा कायमस्वरूपी तोडगा किंवा पर्याय होऊ शकत नाही. रेवस पाणी पुरवठा योजनेचे पाणी बेभरवशाचे झाले आहे. त्यामुळे ठोस उपाययोजना करून पाणीप्रश्न निकाली काढण्याची मागणी होत असताना, राजीपचे सदस्य दिलीप भोईर यांनी हाती घेतलेले काम दिलासा देणारे असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg