loader
Breaking News
Breaking News
Foto

नागरिकांना अडचणी येणार नाहीत यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे - आमदार सामंत

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - मागील वर्षी पावसाळ्यात उद्भवलेल्या अडचणींचा विचार करून यंदा कोणतीही पुनरावृत्ती होऊ नये, पावसाळ्यापूर्वी मतदारसंघातील प्रत्येक प्रश्न मार्गी लावला गेला पाहिजे. नागरिकांना अडचणी येणार नाहीत यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे, असे ठाम आदेश आमदार सामंत यांनी दिले. लांजा तालुक्यातील मान्सून पूर्व आढावा बैठक सोमवारी आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत रेस्टहाऊस लांजा येथे पार पडली. यावेळी आमदार सामंत बोलत होते, सदर बैठकीला उपविभागीय अधिकारी विश्वजीत गाताडे, तहसीलदार प्रियांका ढोले, गटविकास अधिकारी हिंदुराव गिरी, मुख्याधिकारी अभिजीत कुंभार, गटशिक्षणाधिकारी विनोद सावंग, पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे तसेच इतर सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पुढे बोलताना पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाने तातडीने सर्व उपाययोजना पूर्ण कराव्यात, असे स्पष्ट निर्देश आमदार सामंत यांनी दिले. या आढावा बैठकी दरम्यान तालुक्यातील रस्ते, गटारे, नालेसफाई, वीजपुरवठा, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा तसेच आपत्कालीन यंत्रणा यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच आपत्ती व्यवस्थापन पथक सज्ज ठेवण्याबरोबरच संवेदनशील ठिकाणांची पाहणी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

टाईम्स स्पेशल

याप्रसंगी बैठकीस विविध विभागांचे अधिकारी, ग्रामपंचायत प्रतिनिधी तसेच स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व विभागांनी आपापल्या कामांचा अहवाल सादर करत लवकरात लवकर प्रलंबित कामे पूर्ण करण्याची ग्वाही दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg