loader
Breaking News
Breaking News
Foto

ठाणे स्थानकात लोकल मधून उतरताना धक्का लागल्याने-दोघांची एका प्रवाशाला मारहाण

ठाणे (प्रतिनिधी) - मध्य रेल्वेच्या गर्दीच्या लोकलमध्ये उतरताना लागलेल्या धक्क्याचा राग मनात धरून दोघांनी रेल्वे प्लॅटफॉर्मवरच प्रवासी अमित आप्पा पिरनकर (४७) याना दोघं प्रवाशांनी मारहाण केल्याची घटना ८ एप्रिल रोजी रात्रीच्या वेळी घडली. या प्रकरणी मारहाण करणाऱ्या दोघां जणांवर ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तक्रारदार अमित आप्पा पिरनकर (४७) हे कामावरून घरी परत जाताना परेल स्थानकावरून कसारा स्लो लोकने ठाण्याकडे निघालेले होते. घटनेच्या दिवशी रात्री १०-३० वाजण्याच्या सुमारास ठाणे स्थानकावर उतरत असताना गर्दीत दोन अनोळखी इसमांशी त्यांचा धक्का लागून वाद झाला. या वादातून संबंधितांनी पिरनकर यांना शिवीगाळ करत मारहाण केली. त्यांच्या उजव्या डोळ्यावर जोरात चापट मारल्याने गंभीर दुखापत झाली. या घटनेनंतर स्थानकावरील लोहमार्ग पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले.

टाईम्स स्पेशल

जखमी अवस्थेमुळे पिरनकर यांना तातडीने कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना अधिक उपचारासाठी वॉर्डमध्ये दाखल केले असून, डोळ्याला गंभीर दुखापत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, साहबलाल बाबुराम चौहान (वय ४४) व सुमित चौहान (वय २३) अशी मारहाण करणाऱ्यांची नावे आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास वरीष्ठ पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg