loader
Breaking News
Breaking News
Foto

तु. बा. कदम महाविद्यालयाचा कबड्डीपटू रितेश बिर्जेची ठाणे शहर पोलीस दलात निवड

खेड (प्रतिनिधी): खेड तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या कुणबी शिक्षण प्रसारक संस्था संचलित, तु. बा. कदम महाविद्यालयाचा विद्यार्थी आणि प्रसिद्ध कबड्डीपटू रितेश बिर्जे याने आपल्या कौशल्याच्या जोरावर पोलीस भरतीत देदीप्यमान यश संपादन केले आहे. रितेशची ठाणे शहर पोलीस दलात निवड झाली असून, त्याच्या या यशाने संपूर्ण खेड परिसरात आनंदाची लाट उसळली आहे. कुणबी शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव तथा तु. बा. कदम महाविद्यालयाचे अध्यक्ष अ‍ॅड. तु. ल. डफळे यांनी रितेश बिर्जेचे शाब्दिक अभिनंदन करत त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अ‍ॅड. तु. ल. डफळे यावेळी बोलताना म्हणाले की, "रितेशने केवळ स्वतःचे स्वप्न पूर्ण केले नाही, तर महाविद्यालयाचा आणि संस्थेचा नावलौकिक वाढवला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रासोबतच प्रशासकीय आणि संरक्षण दलात आपली ओळख निर्माण करणे ही अभिमानाची गोष्ट आहे. रितेशचा हा प्रवास इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल." डफळे साहेबांनी रितेशच्या आगामी वाटचालीस शुभेच्छा देत त्याचे मनोबल वाढवले.

टाईम्स स्पेशल

यावेळी संस्थेचे अध्यक्ष भि. म. गोवळकर यांनीही रितेशच्या कष्टाचे कौतुक केले. या प्रसंगी संस्थेचे सहसचिव द. भि. धुमक, खजिनदार राजाभाऊ बैकार, सदस्य बाबाराम तळेकर प्रविण जाधव आणि महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही. एन. साळुंखे यांनी रितेशचे अभिनंदन करून त्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. रितेश बिर्जे याचा एक सामान्य विद्यार्थी ते पोलीस कर्मचारी असा त्याचा हा प्रवास अत्यंत कष्टाचा राहिला आहे. त्याच्या या निवडीमुळे खेडच्या क्रीडा क्षेत्रातूनही मोठे समाधान व्यक्त होत आहे. महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनीही रितेशवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg