सावंतवाडी (वार्ताहर) - सावंतवाडी तालुक्यातील निरवडे गावात सोमवारी (दि. १३ एप्रिल) सायंकाळच्या सुमारास क्षुल्लक कारणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दोन्ही गटांच्या तक्रारीवरून परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार, १३ एप्रिल रोजी सायंकाळी 6.30 ते 7 वाजण्याच्या सुमारास निरवडे, झरबांबर येथे ही घटना घडली. चेतन गोविंद गावडे (रा. निरवडे देऊळवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांनी संशयित आरोपी शिवाजी सुरेश गावडे याला मित्राला जीवे मारण्याची धमकी का दिली, याबद्दल जाब विचारला. या कारणावरून वाद होऊन संशयित आरोपींनी चेतन गावडे, निलेश शिरोडकर, सिताराम गावडे आणि लाडू गावडे यांना लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
तसेच, संशयित शिवाजी गावडे याने सिताराम लाडू गावडे यांच्या हाताचा चावा घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी संशयित लक्ष्मण मोहन गावडे, श्रीमती लक्ष्मी गावडे, शिवाजी सुरेश गावडे, चंद्र धारगळकर आणि सुनील सावंत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे करत आहेत. दुसरीकडे, याच घटनेसंदर्भात लक्ष्मी गावडे (रा. निरवडे माळकरवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे दीर शिवाजी सुरेश गावडे यांना मारहाण होत असताना त्या सोडवण्यास गेल्या असता, त्यांनाही लाकडी दांडक्याने व हाताने मारहाण करण्यात आली.
या प्रकरणी संशयित लाडू गावडे, सिताराम गावडे, चेतन गावडे, गुरुनाथ गावडे, उमाकांत गावडे आणि निलेश शिरोडकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार हनुमंत धोत्रे करत आहेत. घटनेनंतर दोन्ही गटांतील जखमींना वैद्यकीय उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर सोमवारी रात्री उशिरा सावंतवाडी पोलीस ठाण्यात दोन्ही गटांविरुद्ध गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.














































2.jpg)





























.jpg)























































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.