loader
Breaking News
Breaking News
Foto

धामणदिवीत मोठ्या भावाकडून लहान भावाला मारहाण; गुन्हा दाखल

खेड : तालुक्यातील धामणदिवी (घडशीवाडी) येथे मोठ्या भावाने लहान भावाला मारहाण केल्याची घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शत्रुघ्न विश्राम मोरे (६१, रा. धामणदिवी, घडशीवाडी) हे १४ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ५.३० वाजता आपल्या घरी एकटे असताना, त्यांचा मोठा भाऊ भरत विश्राम मोरे हा घरात जबरदस्तीने प्रवेश करून शिवीगाळ करू लागला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यानंतर त्याने शत्रुघ्न मोरे यांची गळपट्टी धरून त्यांना घराबाहेर ओढत नेले व लोखंडी पाईने उजव्या हाताच्या मनगटावर व दंडावर मारहाण केली. या घटनेप्रकरणी शत्रुघ्न मोरे यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून संशयित आरोपी भरत विश्राम मोरे याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg