loader
Breaking News
Breaking News
Foto

​सावंतवाडीत घरफोडीच्या दोन संशयित आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी

सावंतवाडी (प्रतिनिधी) - सावंतवाडी शहरात झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील दोन संशयित आरोपींना सावंतवाडी पोलिसांनी कणकवली न्यायालयातून ताब्यात घेतले आहे. या आरोपींना सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना १५ एप्रिलपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे: राजपूत संतराम पाल (वय ५२, रा. घोडदेव नाका, भाईंदर पूर्व; मूळ रा. तौकलपूर नगर, ता. सहगंज, उत्तर प्रदेश)व राहुल उर्फ दिवानसिंग ओमप्रकाश तोमर (वय ३६, रा. घोडदेव नाका, भाईंदर पूर्व; मूळ रा. गोकुळ गाव, ता. महावल, जि. मथुरा, उत्तर प्रदेश) यांचा समावेश आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सावंतवाडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सरदार पाटील व त्यांच्या टीमने या दोन्ही आरोपींना कणकवली न्यायालयातून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना सावंतवाडी न्यायालयात हजर करण्यात आले होते. ​याबाबत अधिक माहिती देताना पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी सांगितले की, आरोपींकडून चोरीस गेलेला ऐवज आणि चोरीसाठी वापरलेली हत्यारे हस्तगत करणे, तसेच त्यांचा इतर ठिकाणी झालेल्या चोऱ्यांमध्ये काही सहभाग आहे का, याचा कसून तपास पोलीस करत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg