रत्नागिरी : राजिवडा खाडीतील गाळ काढण्याच्या कामाचा 147 कोटीचा आराखडा तयार आहे. निविदा प्रक्रिया देखील झाली आहे. काम लवकरात लवकर सुरुवात होणार आहे. शुभारंभासाठी वाट पाहू नये, त्या विभागाच्या मंत्र्यांशी मी बोलून घेतो, अशा स्पष्ट सूचना राज्याचे उद्योगमंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी जनता दरबारात दिले. पालकमंत्र्यांच्या दुसऱ्या जनता दरबारात 169 अर्ज घेऊन सर्वसामान्य जनता अपेक्षे आली होती. या सर्वांचे प्रश्न समजावून घेऊन जागेवर ते निकाली काढण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहामध्ये जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यामधून यासाठी मोठ्या संख्येने नागरिक आपल्या समस्या घेऊन सकाळी 9 वाजल्यापासून उपस्थित होते. नंबरप्रमाणे नाव नोंदणी करुन या नागरिकांच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आली होती.
नोकऱ्यांपासून अगदी ग्रामपंचायतीमधील विकास कामे घेऊन अनेकजण जनता दरबारात हजर झाले होते. ग्रामपंचायतीमधील लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष भेटून कामे करुन घ्यावीत. आता पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य निवडून आले आहेत. त्यांच्याकडे कामे द्यावीत, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी केल्या. लोकप्रतिनिधींसाठी आपण नेहमीच भेटून त्यांची कामे करीत असतो. हा जनता दरबार सर्वसामान्य लोकांसाठी, त्यांच्या प्रश्नांसाठी असल्याचेही ना. सामंत यांनी स्पष्ट केले. विशेषत: महावितरणबाबत अनेक तक्रारी सर्वसामान्य नागरिकांसह ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनीही मांडल्या. सिंगल फेजचे थ्रीफेज करुन देण्यात अनेक ठिकाणी दुर्लक्ष होत असल्याचे मत काही ग्रामस्थांनी मांडले. रत्नागिरी तालुक्यातील एका गावात सहा महिने बिलेच मिळत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली. बिले वाटप केली जात नसतानाही वीजेचे कनेक्शन बिल भरले नाही म्हणून तोडण्यास कर्मचारी येत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. यावर ना. सामंत यांनी महावितरण्च्या अधिकाऱ्यांची चांगलीच शाळा घेतली.
राजिवडा येथील एका ज्येष्ठ नागरिकाने रस्ता आणि गाळाचा प्रश्न उपस्थित केला. यावेळी खाडीतील मार्ग तयार करण्यासाठी व गाळ उपशासाठी सुमारे 147 कोटीचा आराखडा तयार करण्यात आला असून, याला मंजुरी मिळाली आहे. या कामाच्या शुभारंभासाठी या खात्याच्या मंत्र्यांची वेळ मागितली असल्याचे संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी ना. सामंत यांनी आपण संबंधित खात्याच्या मंत्र्यांशी बोलतो, परंतु कामाला लवकर सुरुवात करा, आम्ही दोघेही त्या कामाच्या शुभारंभाला येऊ असेही स्पष्ट केले. त्याचप्रमाणे राजिवडा येथील बंदराकडे जाणारा रस्त्याचे कामही होईल असे ना. सामंत यांनी स्पष्ट केले.
















































































2.jpg)





























.jpg)





























































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.