loader
Breaking News
Breaking News
Foto

ठाण्यात एका उच्चभ्रू कुटुंबियांना काळी जादू’च्या नावाखाली 1.66 कोटींचा गंडा; गोव्यातून मांत्रिक जेरबंद

ठाणे (प्रतिनिधी) - ठाण्यातील कासारवडवली परिसरातील काळी जादू, विविध पूजा-विधी तसेच १२ ज्योतिर्लिंग यात्रेचे आमिष दाखवत एका उच्चभ्रू गृहसंकुलातील कुटुंबाची तब्बल १ कोटी ६६ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या मंजुनाथ शेट्टी या कथित मांत्रिकाला ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट-१ पथकाने गोव्यातून अटक केली आहे. न्यायालयाने त्याला १५ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन गायकवाड यांनी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कासारवडवली पोलिस ठाण्यात एप्रिलच्या सुरुवातीला याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तपास ठाणे गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. गुन्हे शाखेने तपासाची सूत्रे हाती घेत अवघ्या आठवड्याभरात त्याला जेरबंद करण्यात यश मिळवले. तो गोव्यात कॅसिनोमध्ये येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक प्रकाश शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार सागर सुरलकर आणि मुकुंद आव्हाड यांच्या पथकाने तात्काळ गोव्यात धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर शुक्रवारी रात्री त्याला अटक करण्यात आली.

टाईम्स स्पेशल

प्राथमिक तपासात आरोपीविरुद्ध ठाणे शहर पोलिस आयुक्तालयासह वसई-विरार पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत अशाच प्रकारचे प्रत्येकी एक गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. अंधश्रद्धेची भीती दाखवून त्याने आणखी काही जणांची आर्थिक फसवणूक केली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. तसेच मागील काही वर्षांपासून तो अशा प्रकारे लोकांची फसवणूक करत असल्याची माहितीही उघड झाली आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आणखी पीडित समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg