loader
Breaking News
Breaking News
Foto

ठाण्यात हॉटेलमध्ये देहविक्री रॅकेटवर कारवाई; दलाल महिला अटकेत, दोन पीडितांची सुटका

ठाणे (प्रतिनिधी) - ठाणे शहर पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षेच्या पथकाने हॉटेलमध्ये देहविक्रीचा रॅकेट चालविणाऱ्या एका महिला दलालास अटक केली. त्या महिला दलालाच्या तावडीतून दोन पीडित मुलींची सुटका करण्यात या पथकाला यश आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैशाली गोरडे यांना गोपनीय माहिती मिळाली होती, की कळवा परिसरातील रेती बंदर सर्कलजवळील हॉटेल अमित गार्डन येथे देहविक्रीसाठी दोन मुलींना आणण्यात येणार आहे. त्या माहितीनुसार १० एप्रिल २०२६ रोजी सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

टाईम्स स्पेशल

याप्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्या दलाल महिलेस अटक केली. न्यायालयाने तिला १३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून सुटका केलेल्या दोन्ही पीडित मुलींना उल्हासनगर-५ येथील शांतीसदन सुरक्षा गृहात ठेवण्यात आले आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली गोरडे यांनी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg