loader
Breaking News
Breaking News
Foto

भारतीय जनता पार्टी खेडतर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त स्वच्छता मोहीम

खेड (प्रतिनिधी) - भारतीय जनता पार्टीतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर जिजामाता उद्यान मधील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरातील स्वच्छता मोहीम राबवून व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते व नगर परिषद कर्मचारी यांच्या सहकार्याने परिसर साफ करण्यात आला. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सवाच्या निमित्ताने स्वच्छता आणि सुव्यवस्था राखण्याचा संदेश देत अशा उपक्रमांवर विशेष भर देण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर वेळी उपस्थित भाजपा नेते तथा माजी नगराध्यक्ष अँड वैभव खेडेकर, तालुका अध्यक्ष ऋषिकेश मोरे, शहर अध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, गटनेते रहिम सहिबोल, नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर, माजी नगराध्यक्षा उर्मिला पाटणे शेट्ये, नगरसेविका स्वप्नाली चव्हाण, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस अँड मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, शशांक सिनकर, राजेश जोयसर, शैलेश धारिया, माया गुहागरकर, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, प्रशांत बारटक्के, विजय गुप्ता, व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते खेड नगर परिषद कर्मचारी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg