loader
Breaking News
Breaking News
Foto

रस्त्यावरील खड्डा चुकवण्याच्या नादात गाडीवरील ताबा सुटून आयशर मिक्सर गाडीला धडक

सावंतवाडी : रस्त्यावरील खड्डा चुकवण्याच्या नादात गाडीवरील ताबा सुटून समोरून येणाऱ्या आयशर मिक्सर गाडीला धडक बसून गिरगाव (ता. कुडाळ) येथील 'सिंधू कला नाट्य मंडळ' या दशावतार मंडळाची टाटा मॅजिक गाडी पलटी झाली. हा अपघात सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास झाला. यामध्ये एकूण चार जण जखमी झाले असून मॅजिक कारचालक गंभीर जखमी झाला. सर्वांवर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याबाबत अधिक माहिती अशी की कुडाळ येथील सिंधू कला दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग चंदगड येथे होता. या नाट्यप्रयोगासाठी आठ दशावतार नाट्यकलाकारांना मळगाव येथून घेऊन टाटा मॅजिक चालक शशिकांत राऊळ रा. वेर्ले हा मळगाव घाट मार्गे सावंतवाडी असा जात होता. यावेळी माजगाव येथे भाईसाहेब सावंत समाधी परिसरात महामार्गावर असलेला खड्डा चुकवण्याच्या नादात गाडीवरील ताबा सुटून समोरून येणाऱ्या आयशर मिक्सर या गाडीला समोरून धडक बसली.

टाईम्स स्पेशल

यामध्ये टाटा मॅजिक रस्त्यावर पलटी होऊन आतील प्रवास करणारे दशावतारी कलाकार जखमी झाले. यामध्ये टाटा मॅजिक चालक शशिकांत राऊत यांना काहीशी गंभीर दुखापत झाली. यांच्यासह संतोष केसरकर रा.गाळेल, प्रणित तळकर रा. नाणोस, ओम सामंत रा. मळगाव हे किरकोळ जखमी झाले. या सर्वांवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताचा पंचनामा सावंतवाडी पोलिसांकडून करण्यात आला मात्र उशिरापर्यंत याबाबत पोलिस ठाण्यामध्ये कुठल्याही प्रकारची नोंद करण्यात आली नव्हती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg