ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे पोलिस आयुक्तालयात वर्तक नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रात्री गस्तीदरम्यान संशयित हालचाली करणाऱ्या पोखरण रोड नंबर २ येथील कोकणी पाड्यात राहणाऱ्या संशयित प्रणव प्रभाकर माळी (वय २२) या तरुणाला गावठी कट्टा व जिवंत काडतूससह जेरबंद केले. त्याच्याकडून ते अग्निशस्त्र जप्त करण्यात आले. सदरची कारवाई १२ एप्रिल २०२६ रोजी मध्यरात्री सुमारे १२:४५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. वर्तकनगर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक मेघराज जाधव व त्यांच्या तपास पथकाला बिरसा मुंडा चौक परिसरात पाण्याच्या टाकीजवळ एक इसम संशयितरित्या बसल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार घटनास्थळी धाव घेत त्याला अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला गावठी कट्टा तसेच जीन्सच्या खिशात एक जिवंत काडतूस आढळून आले. यानंतर त्याला ताब्यात घेऊन वर्तक नगर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. या प्रकरणी आर्म अक्ट कलम ३, २५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१), १३५ नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. तसेच त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली अशी माहिती वर्तकनगर पोलिसांनी दिली.














































2.jpg)





























.jpg)























































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.