खेड (प्रतिनिधी) : खेड शहर परिसरात भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होत असून, विविध पक्षांतील पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खेड शहराध्यक्ष प्रणव म्हापूसकर तसेच युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष स्वराज गांधी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने स्थानिक राजकारणात नवी समीकरणे निर्माण झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या कार्यप्रेरणेने प्रेरित होऊन त्यांनी हा निर्णय घेतल्याचे यावेळी सांगितले. भडगाव येथील वैभव खेडेकर यांच्या निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा मंगळवार 14 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.
याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश सुर्वे आणि राजेश कदम यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. हा पक्षप्रवेश विजय गुप्ता यांच्या प्रयत्नातून पार पडल्याचे सांगण्यात आले. शहर प्रमुख भालचंद्र उर्फ नंदू साळवी आणि युवक जिल्हाध्यक्ष मिलिंद नांदगावकर यांनी या तरुणांच्या कार्यकुशलतेचे कौतुक केले. कोणतेही राजकीय किंवा आर्थिक पाठबळ नसतानाही समाजासाठी काम करणाऱ्या या तरुणांनी आता भाजपच्या झेंड्याखाली कार्य करण्याची इच्छा व्यक्त केली. या कार्यक्रमाला खेड नगर परिषदेच्या भाजप नगरसेविका वैभवी खेडेकर, भाजप गटनेते रहीम सहीबोले, उपजिल्हाध्यक्ष संजय आखाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विश्वास व्यक्त केला की, अशा कार्यक्षम तरुणांच्या प्रवेशामुळे आगामी काळात खेड तालुक्यासह संपूर्ण मतदारसंघात भाजपचे प्राबल्य वाढेल. 2029 च्या विधानसभा निवडणुकीत ‘शतप्रतिशत भाजप’चे लक्ष्य साध्य होईल, असा दावा देखील करण्यात आला. दरम्यान, खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी पक्षप्रवेश केलेल्या नव्या कार्यकर्त्यांना योग्य तो मान-सन्मान देऊन त्यांना पुढे नेण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे या पक्षप्रवेशामुळे भाजप संघटना अधिक मजबूत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.























































































































































1.jpg)





































.jpg)











































































































































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)



























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.