loader
Breaking News
Breaking News
Foto

खास. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त लांजा तालुका भाजपाच्यावतीने फळवाटप व धान्यवाटप कार्यक्रम

लांजा (वार्ताहर) - रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त लांजा तालुका भाजपाच्यावतीने शनिवारी ११ एप्रिल रोजी महिलाश्रम लांजा, ग्रामीण रुग्णालय लांजा तसेच कोंडये येथील वृद्धाश्रम या ठिकाणी फळवाटप व धान्यवाटप कार्यक्रम राबविण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

खासदार नारायण राणे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त लांजा तालुका भाजपाच्यावतीने शनिवारी लांजा ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. तर महिलाश्रम लांजा या सेवाभावी संस्थेतील मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.‌ त्याचप्रमाणे कोंडये येथील वृद्धाश्रमात धान्य वाटप करण्यात आले. तसेच तालुक्यातील शिरवली येथील मतिमंद शाळेतील मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

सर्व कार्यक्रमांना भाजपाचे लांजा तालुकाध्यक्ष शैलेश खामकर, विराज हरमले, चंद्रकांत खामकर, जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी श्रीकृष्ण हेगिष्ट्ये, विजय कुरूप, शेखर सावंत, अनिल पन्हळेकर, रवींद्र राणे, सुनील गुरव, श्रीम. दाभोळकर, भक्ती शेट्ये, शारदा गुरव, तुकाराम प्रिंदावणकर, मधुकर पालये आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg