loader
Breaking News
Breaking News
Foto

मंथन शिष्यवृत्ती परीक्षेत कोळथरे शाळेच्या ऋग्वेद आडविलकरचे दैदिप्यमान यश

दापोली (सागर गोवळे) - मंथन वेलफेअर फाऊंडेशन, भारत संचलित ’मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान शिष्यवृत्ती परीक्षा-२०२६’ चा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यामध्ये ना. के. (नाना) मनोहर जि. प. पूर्ण प्राथमिक मराठी शाळा, कोळथरे येथील इयत्ता चौथीचा विद्यार्थी ऋग्वेद रविंद्र आडविलकर याने घवघवीत यश संपादन केले आहे. ऋग्वेदने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावरील गुणवत्ता यादीत स्थान मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. ऋग्वेदने या परीक्षेत अष्टपैलू कामगिरी करत खालीलप्रमाणे क्रमांक पटकावले आहेत: राज्य गुणवत्ता यादी: २९ वा क्रमांक, जिल्हा गुणवत्ता यादी: २३ वा क्रमांक, केंद्र/तालुका गुणवत्ता यादी: ५ वा क्रमांक, ऋग्वेदच्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी योग्य मार्गदर्शन आणि जिद्दीच्या जोरावर राज्यस्तरावर झेप घेतल्याने कोळथरे पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण आहे. ऋग्वेदच्या या यशात त्याच्या कठोर परिश्रमासोबतच शाळेतील शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका गिम्हवणेकर, पवार, हाडे आणि बनकर यांनी त्याला परीक्षेसाठी विशेष सराव व मार्गदर्शन केले होते. ऋग्वेद हा अत्यंत कष्टाळू आणि हुशार विद्यार्थी आहे. त्याच्या या यशामुळे आमच्या शाळेचे नाव उज्ज्वल झाले आहे. हे यश केवळ त्याचे नसून त्याच्या पालकांचे आणि आम्हा सर्व शिक्षकांच्या मेहनतीचे फळ आहे. ऋग्वेदच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ आणि पालकांनी त्याचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले असून त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg