loader
Breaking News
Breaking News
Foto

तेज केंबळे राज्यस्तरीय कोकण विभागात चमकला

आबलोली (संदेश कदम) - गुहागर तालुक्यातील एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेतील इयत्ता पहिलीतील विद्यार्थी तेज तेजस केंबळे याने 150 पैकी 134 गुण मिळवून मंथन राज्यस्तरीय कोकण विभाग स्तरीय यादीत चौथा क्रमांक तर राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत नववा क्रमांक मिळवून उज्ज्वल यश संपादन केले. तसेच इयत्ता पहिलीतील श्रेया सचिन सोनवलकर हिने 150 पैकी 92 गुण मिळवून तर शौर्य दीपक बादावटे यांनी 150 पैकी 54 गुण मिळवून यश संपादन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

इयत्ता इयत्ता तिसरीतील शौर्य संजय राठोड याने 300 पैकी 204 गुण, कुमारी हर्षिता नरेंद्र रहाटे हिने 300 पैकी 198 गुण तसेच देवांश गणेश कीर्वे याने 300 पैकी 146, इयत्ता सहावीतील गार्गी देवेंद्र भोसले हिने 300 पैकी 124 गुण तर इयत्ता सातवीतील विधी गणेश किर्वे यांनी 300 पैकी 146 गुण मिळवून सुयश संपादन केले.

टाईम्स स्पेशल

संस्थेचे अध्यक्ष सचिनशेठ बाईत, सेक्रेटरी स्नेहल बाईत व शाळेच्या मुख्याध्यापिका नेत्रा रहाटे यांनी या सर्वांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. तसेच या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे सचिनशेठ बाईत, स्नेहल बाईत यांनी अभिनंदन केले. यावेळी मुख्याध्यापिका नेत्रा रहाटे, दामोदर गोणबरे, शर्मिष्ठा साळुंखे, शितल सोनवलकर, शमीम मुल्ला, प्रांजली शिगवण तसेच तेजस केंबळे उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg