loader
Breaking News
Breaking News
Foto

किल्ले रायगडावर संतापजनक प्रकार, शिव समाधी स्थळी प्रि-वेडिंग शुटचा व्हिडिओ व्हायरल

महाड (संतोष घरटकर) - किल्ले रायगडावरील शिवरायांच्या समाधी स्थळी प्रि-वेडिंग शुटचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने शिवप्रेमींमधे संताप व्यक्त होत असल्याचे ऐकायला मिळत आहे. हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक किल्ले रायगडावर एका जोडप्याने शिवसमाधी परिसरात प्रि -वेडिंग शुट केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये संबंधित जोडपे हे रायगडावरील शिवसमाधी परिसरात व्हिडिओ शुट करीत असताना दिसत असुन ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या या स्थळाच्या पावित्र्याचा भंग झाला असल्याची भावना संतप्त शिवप्रेमींकडुन व्यक्त करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

किल्ले रायगड या पवित्र अशा ठिकाणी मनोरंजनाच्या नावाखाली प्रि-वेडिंग शुट करने हे अत्यंत अयोग्य आहे. अशीही भावना शिवप्रेमी व्यक्त करीत असुन अशा प्रकारच्या शुटिंगवर बंदी घालावी, अशी मागणी संतप्त शिवप्रेमी यांच्या कडून करण्यात येत आहे. दरम्यान केंद्रीय पुरातत्त्व विभागाने सदर घटनेची गंभीर दखल घेत जबाबदार व्यक्तीवर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी करण्यात येत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg