शास्त्रीपूल (वहाब दळवी) - एका चालकाचा बेजबाबदारपणा आणि वाहतुकीच्या नियमांना हरताळ फासण्याची वृत्ती दुसऱ्यासाठी किती जीवघेणी ठरू शकते, याचा थरार सोमवारी रात्री संगमेश्वर-देवरुख राज्यमार्गावरील लोवले येथे पाहायला मिळाला. वळणावर वाहन नियंत्रित ठेवण्याऐवजी ते थेट रस्त्याच्या मधोमध घुसल्यामुळे समोरासमोर झालेल्या धडकेत बॉक्साईडने भरलेला ट्रक थेट दरीत कोसळला. या भीषण अपघातात सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी, दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सोमवारी रात्री १०:३० ते ११ च्या सुमारास देवरुखकडून संगमेश्वरकडे येणारे एलपी वाहन (एमएच ४६ बीएफ ६२१०) लोवले येथील वळणावर आले. त्याचवेळी चिपळूणहून बॉक्साईड घेऊन देवरुखच्या दिशेने जाणारा ट्रक (एमएच १० सीआर ३४५६) समोरून येत होता. नियमानुसार वळणावर आपल्या बाजूने जाणे अपेक्षित असताना, एलपी चालकाने वाहन थेट रस्त्याच्या मधोमध आणले. समोरून येणाऱ्या ट्रक चालकाला बाजूला जाण्यास जागाच उरली नाही आणि दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली.
या धडकेनंतर ट्रकवरील ताबा सुटून तो पाच ते सहा फूट खोल दरीत कोसळला. पोलीस आणि नागरिकांचे धाडसी बचावकार्य अपघाताची भीषणता एवढी होती की, एलपी वाहनाच्या केबिनचा चक्काचूर झाला. यामध्ये चालक बालाजी जलबा कोंडेवार (३५, रा. नांदेड) हा केबिनमध्येच अडकून पडला होता. रक्ताच्या थारोळ्यात आणि मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या या चालकाला वाचवण्यासाठी संगमेश्वर पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने धाव घेतली. पोलिसांनी अत्यंत शिताफीने आणि कसरतीने केबिन कापून चालकाला बाहेर काढले. या थरारक बचावकार्यामुळे चालकाचे प्राण वाचले. ट्रक चालक मोहम्मद युसूफ शफी शेख हा देखील या अपघातात जखमी झाला असून दोघांवरही संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघातानंतर परिसरात संतापाची लाट असून चर्चेला उधाण आले आहे. अपघातस्थळी जमलेल्या लोकांच्या मते, बॉक्साईड ट्रक चालकाची कोणतीही चूक नव्हती. एलपी चालकाने वळणावर गाडी मधोमध आणली नसती, तर हा अपघात टाळता आला असता. "समोरच्याची चूक आणि दुसऱ्याचा जीव धोक्यात" अशीच काहीशी परिस्थिती येथे निर्माण झाली होती. या अपघातामुळे राज्यमार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. संगमेश्वर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला आणि अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. मात्र, या अपघाताने वळणांवरील बेशिस्त वाहनचालकांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.















































































































































1.jpg)





































.jpg)











































































































































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)



























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.