loader
Breaking News
Breaking News
Foto

अलसुरे ग्रामपंचायत पोटनिवडणूक बिनविरोध; नजीर महाडीक यांची निवड निश्चित

खेड (प्रतिनिधी) - खेड तालुक्यातील मौजे अलसुरे येथील ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक ०१ साठी झालेल्या पोटनिवडणुकीत नजीर उमर महाडीक यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. विरोधी उमेदवाराने अर्ज न भरल्यामुळे ही निवडणूक कोणत्याही चुरशीशिवाय पार पडली असून गावात सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अलसुरे ग्रुप ग्रामपंचायतच्या या पोटनिवडणुकीत संपूर्ण गावकऱ्यांनी एकमताने बिनविरोध निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला. गावातील एकोप्याचे दर्शन घडवत ही निवडणूक पार पडल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी बोलताना, नवनिर्वाचित सदस्य महाडीक हे पुढील काळात आपल्या वार्डाचा विकास अधिक चांगल्या पद्धतीने करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. ग्रामपंचायत स्तरावरील पोटनिवडणुका बिनविरोध होणे हे गावाच्या विकासासाठी आणि ऐक्यासाठी महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

संपूर्ण गावाने एकत्रित निर्णय घेत अलसुरे ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक ०१ ची पोटनिवडणूक बिनविरोध केल्याबद्दल खेड पंचायत समितीचे माजी सभापती मन्सूर नाडकर यांनी ग्रामस्थांचे आभार मानले. या बिनविरोध निवडणुकीमुळे गावातील एकजूट अधिक दृढ झाली असून, पुढील काळात विकासकामांना गती मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg