loader
Breaking News
Breaking News
Foto

विनापरवाना बंदूक आणि जिवंत काडतूसे जवळ बाळगल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

लांजा (संजय साळवी) - विनापरवाना बंदूक आणि जिवंत काडतूसे जवळ बाळगल्या प्रकरणी लांजा पोलिसांनी दोघांना बंदूक आणि काडतूसांसह ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी १५ एप्रिल रोजी दुपारी लांजा पोलिसांनी शहराजवळच्या देवराई येथे छापा टाकला. यावेळी देवराई गोपाळ कृष्ण मंदिर जवळील नदीच्या पलीकडे झुडपात अरुण नारायण चौगुले (४६ वर्षे, रा. भडे, पिंपळवाडी ता. लांजा) आणि शैलेश दिलीप मेस्त्री (३३ वर्षे, रा. इसवली सुतारवाडी) असे दोघेजण १२ बोअरची बंदूक आणि जिवंत काडतूसांसह आढळून आले. या बंदुकीची किंमत दहा हजार रुपये आणि ३३० रुपये किंमतीची जिवंत काडतूसे असा एकूण १० हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विनापरवाना बारा बोअरची बंदूक आणि तीन जिवंत काडतूसे जवळ बाळगल्या प्रकरणी लांजा पोलिसांनी अरुण चौगुले आणि शैलेश मेस्त्री या दोघांवर भारतीय हत्यार अधिनियम १९५९ चे कलम ३ (१) / २५, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोद सरंगले हे करत आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg