दापोली (सागर गोवळे) - संकटकाळात व्यापारी बांधव एकमेकांच्या पाठीशी कसे खंबीरपणे उभे राहतात, याचा प्रत्यय दापोलीत पुन्हा एकदा आला आहे. दापोली बाजारपेठेत ४ एप्रिल रोजी लागलेल्या भीषण आगीत नुकसान झालेल्या दोन दुकानदारांना दापोली शहर व्यापारी संघटनेच्या वतीने २ लाख ७० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात आले.
गेल्या आठवड्यात दापोली बाजारपेठेत लागलेल्या आगीत एकूण ५ दुकानांचे नुकसान झाले होते. यापैकी ३ दुकानदारांनी आर्थिक मदत घेण्यास नम्रपणे नकार दिला. मात्र, ज्या २ दुकानदारांचे मोठे नुकसान झाले होते, त्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा उभा करण्यासाठी व्यापारी संघटनेने पुढाकार घेतला. संघटनेचे अध्यक्ष श्री. संदिपजी राजपुरे, विश्वस्त दिनेशजी नायक, उपाध्यक्ष राकेशजी कोटीया, कौशिक मेहता, सचिव दिनेश जैन आणि योगेशजी पिंपळे यांच्या हस्ते ही मदत सुपूर्द करण्यात आली. आग लागली त्या रात्री स्वतःच्या जिवाची पर्वा न करता आग विझवण्यासाठी धावून आलेल्या स्थानिक तरुणांचा आणि कर्मचाऱ्यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये साई मोरे, विकास पालटे, गणेश सकपाळ, सचिन झगडे, विजय धोपट, आणि प्रतिक (मुन्ना) दळवी या तरुणांचा समावेश होता. अमित रेमजे आणि खेड नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी केलेल्या कामगिरीचेही कौतुक करण्यात आले. सन्मान हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी पाण्याचा पुरवठा करून मोलाची मदत केली. या सर्वांचा सत्कार खजिनदार माणिक दाभोळे, जावेद मणियार आणि सचिन गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला.
















































































1.jpg)





































.jpg)











































































































































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)
























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.