loader
Breaking News
Breaking News
Foto

त्रिवेणी संगम ग्रुप आसुद आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

दापोली (प्रतिनिधी) - दापोली तालुक्यातील आसुद येथील त्रिवेणी संगम ग्रुप हा सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रिडा, आरोग्य विषयक मोफत उपचार व मार्गदर्शन शिबिरे आदी विविध प्रकारच्या समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करणारा आणि सातत्य राखणारा तालूक्यातील एकमेव असा ग्रुप आहे. अशा ग्रुपकडून ग्रुपचे अध्यक्ष नंदकुमार बांद्रे यांच्या कल्पक नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली सर्व सदस्यांच्या एकोप्याने दरवर्षी वर्षभरात स्वखर्चाने विविध उपक्रम राबवले जातात. तशाच प्रकारचा आरोग्यविषयक रक्तदान शिबिराचा सामाजिक उपक्रम आसुद येथे राबविण्यात आला. या रक्तदान शिबिरात तालुक्यातील तब्बल १०५ जणांनी रक्तदान केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आसुद येथील त्रिवेणी संगम ग्रुपने महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मरणार्थ तसेच राष्ट्रवादी काँग्रेस च्या जिल्हाध्यक्षा नगरसेविका साधना बोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त आसूद ग्रामपंचायत कार्यालयात रक्तदानाचा शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला होता. या रक्तदान शिबिरात अनेकांनी रक्तदान केलेच शिवाय या आयोजिलेल्या रक्तदान शिबिरात दिव्यांग बांधवांनी तसेच पोलिस कर्मचाऱ्यांनीही रक्तदान करून मानवतेच्या सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला. हे रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी त्रिवेणी संगम ग्रुपचे अध्यक्ष नंदकुमार बांद्रे, दिलीप बांद्रे, कल्पेश माने, नासिर मुरुडकर, समृद्धी रेवाळे, ऋतिका चव्हाण, संदिप रेवाळे, प्रकाश शिर्के, कावेरी माने, विनोद मांडवकर, जयवंत बांद्रे यांनी प्रचंड मेहनत घेतली.

टाईम्स स्पेशल

या रक्तदान शिबिरासाठी सायन ब्लड बँकेचे डॉ. जयवंत गाडे, डॉ. संकेत अस्वले आदिंच्या वैद्यकीय टिमने उत्कृष्ट सेवा बजावली या रक्तदान शिबिरात सागर बुरटे, प्रज्ञा बुरटे, अभिषेक पदिर, रिहान, आर्यन प्रभावळकर, संतोष अबगुल, प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा संतोष अबगुल तसेच प्रतिष्ठानचे दापोली तालुका अध्यक्ष किशोर कानसे, कार्यालय प्रमुख निलेश भांबीड,किसन जाधव, प्राजक्ता निवळकर, दिपक धामणे, सागर आग्रे यांनी रक्तदान शिबिरात उपस्थित राहून मेहनत घेतली. रक्तदान केलेल्या सर्व रक्तदात्यांचा त्रिवेणी संगम ग्रुप आसुदने सन्मानचिन्ह देऊन उचित सन्मान केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg